सांगली अर्बन बॅंकेची आज होणार मतमोजणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli Urban Bank counted

सांगली अर्बन बॅंकेची आज होणार मतमोजणी

सांगली : सांगली अर्बन बॅंकेची मतमोजणी मिरज येथील शेतकरी भवनात उद्या (ता. २८) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी ३० टेबल आणि शंभर कर्मचारी नियुक्त केले आहेत. दुपारी एकपर्यंत सर्व निकाल अपेक्षीत आहेत.

सांगली अर्बन बँकेसाठी रविवारी मतदान झाले होते. बॅंकेच्या ६० हजार ३३ सभासदापैकी ९१ मतदान केंद्रांवर केवळ १२ हजार ९२९ मतदारांनी मतदान केले. केवळ २१.५३ टक्के मतदान झाले आहे. १७ संचालकांपैकी एक जागा बिनविरोध झाली असून उर्वरित १६ जागांसाठी निवडणूक झाली. यासाठी ३३ उमेदवार आपले भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन चव्हाण यांनी सांगितले की, मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.

सकाळी आठला मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी एकपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, असे नियोजन केले आहे. सत्ताधारी गटाचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष गणेशराव गाडगीळ, आमदार सुधीर गाडगीळ, तर बचाओ पॅनेलचे बापूसाहेब पुजारी, माजी अध्यक्ष प्रमोद पुजारी करीत आहेत. सत्ताधारी पॅनेलचे डॉ. रवींद्र आरळी बिनविरोध झालेत. बॅंकेचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील परभणी, जालना, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात आहे.

Web Title: Sangli Urban Bank Counted Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top