ढाई अक्षर अन्‌ एक "ऑर्डर' 

0Love_2_0
0Love_2_0

भारतीय सण-उत्सव आणि बाजारपेठेतील उठाव हे पारंपारिक समीकरण आणि उत्सवाचे रुप घेतलेला व्हॅलेंटाईन डे आणि त्यानिमित्ताने लक्षवेधी ऑफर्सनी गजबजलेली ऑनलाईन बाजारपेठ, असे एक हटके चित्र सध्या दिसते आहे. प्रेम डोळ्यांतून व्यक्त झालं पाहिजे, हा काळ मागे पडला. नव्या काळाच्या नव्या संकल्पना आणि त्यात महागड्या भेटवस्तूंना मिळालेले केंद्रस्थान हेच या बाजारपेठ विकासाचे गमक आहे. तरुणाईसाठी हा खास खरेदीसोहळा सध्या धडाक्‍यात सुरु आहे. कुरिअरवाल्यांचे कामही वाढले आहे. 

रोज तुला शब्दांत शोधण्याचा प्रयत्न करतो... पण शब्द लिहिताना मीच शब्दांत हरवतो... धडधड वाढवली आहे. व्हॅलेंटाईन वीक आता अंतिम पर्वात आहे. प्रेम उत्सवात तरुणाई सहभागी झाली असून कॉलेज कॅम्पस्‌ आणि सीसीडीज्‌ फुल्ल होताहेत. "प्यार का इजहार' करण्यासाठी नवे फंडे शोधले जात आहेत. कोण बिनधास्तपणे मन मोकळं करतो तर कुणी शब्दांची जुळवाजुळव. सोबतीला आहेत, एकापेक्षा एक ब्रॅंड आणि चमचमणाऱ्या वस्तू. 


14 फ्रेबुवारीची सारे वाट पाहताहेत. व्हॅलेंटाईन्स डेची तरुणाईला प्रतिक्षा आहे. हा स्पेशल डे खास क्षणांनी सजवायचे प्लॅनिंग सुरू झाले आहे. कॉलेजच्या परीक्षेची फिकीर कधीच केली नाही, पण या परीक्षेची जोरदार तयारी सुरू आहे. या तयारीत बाजारपेठ आलीच. कारण, भावना किती स्ट्रॉंग आहेत, त्यापेक्षा गिफ्ट किती भारी आहे, याला आता अधिक महत्त्व आल्याचे दिसते. "तेरी मेरी यारी...' व्हलेंटाईन डेचा "फिव्हर' तरुणाईवर चांगलाच चढलाय. 

गिफ्ट सेंटर्सवर ग्रिटिंग कार्ड, लव्हस्टोरी बुक, टेडी बेअर, चॉकलेटसह भेटवस्तू घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. सध्याच्या ट्रेंडमध्ये ग्रिटिंग कार्ड सोबत कुछ तो मिठा है म्हणत चॉकलेट दिले जात आहे. पन्नास रूपयांपासून दोन हजार रूपयांपर्यंत ग्रिटिंग कार्ड बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब देण्याची परंपरा आहे. तेच फुल, तेच काटे, असले तरी व्हॅलेंटाईन डे निमित्त किमती वधारल्या आहेत. सुमारे दहा ते वीस टक्‍क्‍यांनी फुलाचे दर वाढले आहे. पण, होवून दे खर्च...असंच म्हटले जात आहे. प्रत्येकजण स्वतःचे असे प्लॅनिंग करतो आहे. या दिवसाच्या निमित्ताने का होईना आपलं प्रेम व्यक्त करायचंच, मैत्री आणखी दृढ करायचीच, या भावनेने तरुणाई या दिवसाची आतुरतेने वाट पाहतेय. 

सोशल मिडयावर फिव्हर 
गेल्या आठवड्यापासून विविध डे साजरे होत असून फेसबुक, व्हॉटस्‌अप, ट्‌विटरसह सोशल मिडियावर व्हॅलेंटाईन फिव्हर सुरू आहे. फेसबुकच्या भिंतीवर प्रेमाच्या चारोळ्या लिहल्या जात आहे. 

 सीसीडी अन्‌ हॉटेल्स्‌वर ऑफर 
कॉफी कॅफे डेसह हॉटेल्सवर व्हॅलेंटाईनला ट्रीट तो बनती है..! यासाठी सीसीडी आणि हॉटेल्सवर विविध ऑफर्स जाहीर केल्या जात आहे. एकंदरीतच व्हॅलेंटाईनचा सारा माहोल सर्वत्र दिसतो आहे. 

 ऑनलाईन मार्केट 
ऑनलाईन मार्केटमध्ये व्हॅलेंटाईन डेनिमित्त भेटवस्तूंचा पाऊस पडतोय. प्रत्येक ऑनलाईन मार्केटमध्ये त्याची विशेष जाहिरात करण्यात आली आहे. त्यात परफ्यूमपासून पर्स, ड्राय फ्लॉवर्स, स्कार्फ, हार्ट की अशा अनेक भन्नाट नव्या वस्तू या बाजारात खुणावत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com