सांगली: पोटाची खळगी भरण्यासाठी ‘ते’ कुटुंब दीड हजार किलोमीटरवरून सांगलीत आले. रस्त्याकडेला त्यांनी संसार मांडला. दिवसभर सिग्नलजवळ फुगे विकून ते संसाराचा गाडा ओढत. दिवाळीच्या पहिल्याच दिवशीच काळाने त्यांच्यावर घाला घातला..त्याचं एक वर्षाचं देखणं लेकरू पहाटे चोरट्याने पळवून नेले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. विश्रामबाग चौकात ही घटना घडली. ऐन दिवाळीत लेकरू चोरीच्या घटनेने पोलिसही गहिवरले. विश्रामबागसह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तातडीने रवाना झाले. दिवसभर त्यांचा शोध सुरू होता. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांना यश आले नव्हते..घडलं असं, की राजस्थानच्या कोटा येथील एक कुटुंब उदरनिर्वाहासाठी सांगलीत आले आहे. त्यांना एक मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा आहे. दररोज सकाळी ते सारेच विश्रामबाग चौकात फुगे विकायचे. त्यातून पैसे मिळवून ते कुटुंब चालवायचे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता हे कुटुंब चौकातील दुभाजकावरच झोपायचे..जगण्यासाठी त्या कुटुंबाची धडपड पाहून अनेकांना पाझर फुटायचा. अनेकजण त्यांच्याकडून फुगे घ्यायचे. कालही दिवाळीसाठी सावली बेघर निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर यांनी त्यांना नवे कपडे दिले. दिवाळीच्या सणात त्यांनाही सहभागी करून घेण्यात आले. काल नेहमीप्रमाणे ते रात्री त्याच ठिकाणी झोपले..पहाटेच्या सुमारास त्याचे एक वर्षाचं लेकरू चोरट्याने पळवून नेले. त्यानंतर त्या मातेस लेकरू न दिसल्याने तिने टाहो फोडला. परिसरात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या अनेकांना त्या मातेने, ‘माझं बाळ चोरीला गेलं, शोधून द्या,’ अशी विनंती केली. त्यानंतर ती माता विश्रामबाग पोलिस ठाण्यात गेली. त्याठिकाणी निरीक्षक सुधीर भालेराव यांना माहिती दिली. त्यांनाही माहिती मिळताच ते गहिवरले. त्यांना तातडीने मुलाच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांचे पथक रवाना केले. ही बाब साऱ्यांना समजल्यानंतर अधीक्षक संदीप घुगे यांना तातडीने एलसीबीचे पथकही त्या बाळाच्या शोधासाठी रवाना केले. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र, ते बाळ शोधून काढायचेच, असा चंग आता पोलिसांनी बांधला आहे..Crime News : जळगाव-अजिंठा रोडवर गोळीबार: कुसुंबा गावात ८ ते १० जणांच्या टोळक्याची दहशत; दुचाकी दगडांनी ठेचली.बाळचोरीच्या घटनामिरजेतील शासकीय रुग्णालयातून काही महिन्यांपूर्वी बाळचोरीची घटना घडली होती. ४८ तासांनंतर महात्मा गांधी पोलिसांनी त्या बाळाचा शोध घेतला. अगदी सुखरूपपणे त्या मातेकडे बाळ सुपूर्द केले. बाळचोरीच्या या दुसऱ्या घटनेनंतर याची टोळी सक्रिय आहे का, असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.