
सांगली : आठवीपर्यंत नापास करता येणार नाही, हा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. आता पाचवी आणि आठवीत नापास झालेले विद्यार्थी ‘नापास’च राहणार आहेत. त्यांना दोन महिन्यांत फेरपरीक्षा देता येणार आहे. या निर्णयाचे शिक्षणातील जाणकार व्यक्तींसह पालकांनी स्वागत केले होते.