सांगली : राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर राजकीय पटलावर यंदा ‘लाडकी बहीण’ म्हणून महिलांची प्रचंड चर्चा झाली. जिल्ह्यातही महिलांची कामगिरी दमदार राहिली. साहित्य, क्रीडा, प्रशासकीय पातळीवर महिलांना नेतृत्वाची संधी मिळाली. .डॉ. भवाळकरांची निवड, मानाचा तुरादिल्लीत फेब्रुवारीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड हा सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला. महिलांच्या कामगिरीचा आढावा घेणारा डॉ. भवाळकर यांची निवड अत्यंत महत्त्वाची आणि सन्मानाची ठरली..स्मृती मानधनाचा विक्रमभारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिने यावर्षी शतकांचा विक्रम केला. एका कॅलेंडर वर्षात चार शतके झळकवणारी ती पहिली आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरली. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथील वाका क्रीडांगणावर विक्रमी शतक झळकावले. ९९ चेंडूंचा सामना करताना तिने ११० धावांची खेळी केली..महत्त्वाच्या पदांवर महिलांची कामगिरीप्रशासकीय पातळीवर जिल्ह्याच्या कारभारात महिलांचे स्थान लक्षवेधी राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रशासक म्हणून चांगली कामगिरी केली. जिल्हा प्रशासनात डॉ. स्वाती देशमुख या अपर जिल्हाधिकारी, तर ज्योती पाटील या निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नीता शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभावी कामगिरी केली. जिल्हा पोलिस दलात अपर अधीक्षक म्हणून रितू खोखर यांनी प्रभावी कामगिरीने छाप सोडली..Officials Assaulted : थकीत बिलाचे मीटर काढताना कुंभारीत अधिकाऱ्यांना धक्काबुक्की; जत पोलिसांत एकावर गुन्हा.महिला मतदार पुरुषांहून अधिकविधानसभा निवडणुकीत यावेळी मतदार संख्येत लक्षवेधी बाब नोंदवली गेली. जिल्ह्यातील तीन मतदार संघांत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांहून अधिक नोंदवली गेली. मिरज मतदार संघात पुरुष १ लाख ७१ हजार ६४६, तर महिला मतदार संख्या १ लाख ७२ हजार १९८ होती. सांगलीत पुरुष १ लाख ७७ हजार ६९३, तर महिला मतदार १ लाख ७८ हजार ६४२ इतकी होती. पलूस कडेगाव मतदार संघात पुरुष मतदार १ लाख ४६ हजार ७२, तर महिलांची संख्या १ लाख ४६ हजार ७८६ इतकी नोंदवली गेली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.