esakal | गुरुजींनी लावलीय पुरस्कारासाठी फिल्डिंग
sakal

बोलून बातमी शोधा

officers meet schools and teachers are not in school in ratnagiri

गुरुजींनी लावलीय पुरस्कारासाठी फिल्डिंग

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : शिक्षक हे आदर्शच असले पाहिजेत, अशी अपेक्षा समाज ठेवतो. त्यातील अधिक उत्तम शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्याची परंपरा आहे. ५ सप्टेंबर रोजी शिक्षण दिनी त्यांचा गौरव केला जातो. परंतू, या गौरवासाठी गुरुजींनी फिल्डिंग लावावी, असे प्रकार आता वाढले आहेत. सांगली जिल्हा परिषदेत असा प्रकार घडत असून त्याची जोरदार चर्चा होत आहे. शिक्षकांनी पुरस्कारासाठी लॉबिंग केले आहे.

जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षक आणि गुणवंत शिक्षक पुरस्कार निवड समितीची बैठक आज (गुरुवारी) होत आहे. दहा तालुक्यातून आलेल्या पात्र प्रस्तावांची छाननी करुन नावे निश्चित केली जाणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत पुरस्कार मिळविण्यासाठी मिनी मंत्रालयाच्या पदाधिकाऱ्यांकडे शिक्षकांनी फिल्डिंग लावल्याचे चित्र दिसत आहे.

शिक्षक दिनानिमित्ताने जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील २० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात येते. या पुरस्काराठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पात्र शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या प्रस्तावाची छाननी निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. समितीची अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी चार वाजता बैठक होणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षण सभापती आशा पाटील, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, समितीचे सदस्य अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार आपल्यालाच मिळावा यासाठी पात्र शिक्षकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पदाधिकारी आणि नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षण विभागाकडे जिल्ह्यातून २० शिक्षकांचे प्रस्ताव आले आहेत. या प्रस्तावांची आज छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर अंतिम नावे निवडी केल्या जातील. मात्र नियमानुसार पात्र असलेल्या शिक्षकांचीच निवड केली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र त्या पद्धतीने होणार का? हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

अजित झळके पश्चिम महाराष्ट्र

loading image
go to top