

Crowd at Sangli nomination center on the final day of filing.
sakal
सांगली : जिल्ह्यातील विविध तालुक्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी झाली. शेवटच्या दोन दिवसांत अर्ज भरण्याचा वेग वाढल्याने जवळपास सर्व तालुक्यांत बहुपक्षीय आणि चुरशीच्या लढतीचे चित्र दिसून आले. अर्जांची छाननी आणि माघारीनंतरच प्रत्यक्ष लढतीतील उमेदवारांची संख्या आणि पुढील राजकीय समीकरणं स्पष्ट होईल.