Deputy Chief Minister Sunetra Pawar
esakal
सांगली : जिल्हा परिषदेच्या निकालानंतर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले (Sangli Zilla Parishad Results) होते. काठावरचे बहुमत असणाऱ्या भाजपने यापूर्वीच राष्ट्रवादी आमच्या सोबत असल्याचे जाहीर केले होते. हा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) घेतील, असे जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अध्यक्ष महायुतीचा की महाविकास आघाडीचा या निर्णय हायकमांडच्या कोर्टात गेला आहे.