ऋषी कपूर सांगलीच्या छोऱ्याला अडवत म्हणाले...

rhishi kapoor
rhishi kapoor
Updated on

माझे बाबा चित्रपटाच्या कामासाठी मुंबईत असायचे आणि रिकॉर्डिंग वगैरे असेल तर मला सोबत घेवून यायचे....

माझा interest कश्यात तर मुंबई म्हणजे अर्थात कपड़े शूज भरपूर खरेदी ...
म्हणजे सांगलीत जावून नुसतं शायनिंग ...
असो....
हा फ़ोटो आहे चांदनी फ़िल्म मधला ...
" परबतसे आयी घटा टकराई ...
पानी में कैसी ये आग लगायी " या गाण्यातला...
म्हणजे चांदनी फ़िल्मच्या अगोदरचा....
तर किस्सा असा आहे....
मला शूज खरेदी करायची होती...
आणि माझ्या बाबांच चप्पल खरेदीचं कायमच दुकान होतं....
दादर टीटीला
#दाऊद_शूज नावाचं
मी आणि माझे बाबा आम्ही संध्याकाळी तिथे गेलो....
बाप रे एक से एक व्हरायटी ....
बजेटचं टेंशन मला नसायचं म्हणजे बाबांना असायचं... म्हणजे ते मला मी बाप झाल्यावर कळलं ....
असो....
ते दुकानाचे मालक माझ्या बाबांच्या खुप ओळखीचे झाले होते....
ते आणि बाबा बोलत होते...
एक सेल्समन मला शूज दाखवत होता...
मला एक व्हाइट शूज आवड़ला होता....
पण तो लगेच मळेल....
म्हणून माझे बाबा ते नको म्हणत होते...
माझा हट्ट तेच शूज घ्यायचा होता.....
आणि तो मालक सुद्धा माझ्या बाबांना सांगत होता...
" अरे दादा ये आप धो सकते हो.... "
कोई टेंशन नही....
हळूच मी शूजच्या लेबल कड़े बघितलं 1299/- कींमत त्यावेळी ही किंमत जरा जास्तच होती..   
मी लगेच म्हणालो आपण दूसरे बघुयात...
एक शूज मी ट्रायल साठी पायात घातला ...
रिच लुक आणि फील सुद्धा रिच...
पण किंमत आमच्या रिचच्या बाहेर होती...
त्या मालकाने ते शूज दोनी पायात घालायला सांगितले आणि थोडं चालायला सांगितलं....
मी चालायला सुरवात करणार इतक्यात....
दुकानात ६ ते ७ जण शिरले त्यामधे दोन लेडीजपण होत्या....
ते सगळे आत आले आणि दुकानात धावपळ सुरु झाली...
एक आवाज आला
सलाम वाले कुम ...
कैसे हो जावेदभाई जावेदभाई म्हणजे ते मालक
वाले कुम सलाम चिंटूशेठ ....
माझा आणि बाबांचा पुतळा झाला होता ओ ...
साक्षात ऋषि कपूर १० फूटावर ...
तेच फास्ट बोलणं
गोरापान नाही लालबूंद चेहरा
हेयर स्टाइल बिटल्स....
ब्लड रेड पोलोनेक टी शर्ट ...
ब्लैक पैंट आणि शूज
काय राव Personality सॉलिड ....
त्यांना शूट साठी शूज घ्यायचे होते....
म्हणून ते आले होते.... आमच्या सारखे खरेदीला आलेले १० / १५ जण होते...
सगळ्यांकड़े एक नजर फिरली आणि ते गोंडस स्माइल ...
Hello Hello ...
Carry on Carry on ...
असं ते सगळ्यांना सांगत होते...
मालक आणि ते काहीतरी बोलत होते....
इतक्यात त्यांच्यासोबत एकजण आले होते बहुतेक कॉस्ट्यूम डिपार्टमेंट पैकी असावेत ...
त्यांचे माझ्या पायाकडे
लक्ष गेले...
त्यांनी मला जवळ बोलावलं आणि ऋषिसरांच्या जवळ घेवून गेले...  
आमच्यातलं १० फूटाचे अंतर ८ फुट कमी झालं होतं .....  आता ऋषिसर २ फुटावर ....
ते शूज माझ्या पायात निरखुन बघत होते...
त्यांनी मला शूजचा तळ दाखवायला सांगितला ...
आणि हसत हसत म्हणाले...
अरे बारिश में है गाना
नाचना है....ना
इसीलिए देख रहा हूँ ....
नयी फ़िल्म की शूटिंग शुरू है
चांदनी नाम है.... फ़िल्म का
मला म्हणाले क्या नाम है तुम्हारा ...
मी म्हणालो निशांत ....
बंगाली हो ...
मी म्हणालो नाही
मराठी हूँ ...
अच्छा ...
अरे निशांत ये नाम बंगाली में ज्यादा होता है...
तुमने लिया है ये शूज ...
मी काही बोलण्याच्या आतच माझे बाबा म्हणाले....
हा लिया है...
तेवढ्यात त्या जावेदभाईनी माझ्या बाबांची आणी त्यांची ओळख करुन दिली...
ये मराठी फिल्म प्रोड्यूसर है और ये उनका लड़का है....
मराठी फिल्म प्रोड्यूसर ऐकल्यावर ते जाम खुष झाले....
अरे वा अपने ही बीरादरी के है ये.......
कहाँ के रहनेवाले हो....
माझे बाबा म्हणाले सांगली के....
ते .... सांगली ....?
कोल्हापुर के पास है ...
मिरज ...
अच्छा अच्छा .....
खुप मनापासून ते बोलत होते....
आणि ते जावेदभाई ना म्हणाले ...
चलता हूँ ...
ये प्रोडक्शन के लोग है....
और भी उनको शूज चप्पल चाहिए.... दे देना ..  
चलो खुदा हाफिज.....
आणि बाबांकड़े बघुन म्हणाले ...
न्यू प्रोजेक्ट के लिए
All The Best ...
आणि मला काय म्हणायच्या आत मी त्यांच्या पाया पडलो... तेवढ्यात त्यांनी मला पकडलं आणि म्हणाले सिर्फ और सिर्फ भगवान और माबाप के पैर छूना ...
और किसी के नही छुना ...
मी त्यांना Signature साठी Request केली ...पण माझ्याकड़े कागद न्हवता... तिथल्या नोट पैड वर मी त्यांची सही घेतली....
चलो चलता हूँ म्हणत....
ते आणि त्यांच्यासोबत दोघेजण निघुन गेले......

काहीच सुधरत न्हवत....
अरे कसला गोड़ माणुस आहे हा......
मी आणि बाबां आम्ही खुष होतो...
माझ्या बाबांनी ते शूज Pack करायला सांगितले....
त्या मालकांचे मनापासून आभार मानले....
त्यावेळी म्हणाले बहोत सालोंसे ये सब कपूर हमारे इधरसे ही चप्पल और शूज लेते है......
फॅमिली रिलेशन है हमारे...

जावेदभाई, ते शूज
आणि त्यासोबतची एका सुपरस्टारची भेट....
एक आयुष्याभराची गोड़ आठवण घेवून बाहेर पडलो....
दुकानाच्या बाहेर आलो....
आणि मला बाबांनी विचारलं झाली ना खरेदी....
मी म्हणालो नाही....
अजुन काय रहिलं आहे.....
मी म्हणालो ब्लड रेड पोलोनेक आणि ब्लैक पैंट ....
माझे बाबा हसले आणि म्हणाले .....
सुधारणार नाहीस बघ तू .....

नंतर मग काय सांगलीत गेल्यावर शाइनिंगच की....
ती ऋषिसरांची सही ...

६ महिन्यानंतर चांदनी फ़िल्मचे पोस्टर बघितले आणि ठरवलं First Day First Show ... बघायचा
आणि बघितला ....
Housefull ....
सिनेमा तर अप्रतिम होताच ....
हे शूज कधी दिसतात ते बघत होतो .....
आंणी हे गाणं सुरु झालं .... आणि दिसले शूज दिसले.....
माझ्या पायात सेम शूज ....
कसलं भारी वाटत होतं मला तुम्हाला सांगतो.....
प्रेशर पण तेवढचं होतं ओ मित्रांच ...
शुज जऱ दिसले नसते ना ..... तर शूज मारल्यासारखं तोंड झालं असतं माझं ....  
त्यानंतर सात आठ वेळा तो चांदनी बघितला ....
तेच शूज घालून.....
आणि अजुन एक सांगायच राहीलं .....
ते शूज पहिल्यांदा चांदनी बघायलो गेलो ....
तेंव्हाच पहिल्यांदा घातले ....   
तो पर्यंत तसेच न वापरता ठेवले होते....  

आणि हो ...
दुकानातुन बाहेर पडल्यावर खरेदी केली होती
ब्लड रेड कलरचा पोलोनेक टी शर्ट सुद्धा घेतला आणि ब्लैक पैंट सुद्धा घेतली अगदी सेम नाही पण जवळपास जाणार घेतलं होतं .....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com