अभिनेत्री तापसी पन्नूसोबत सांगलीची रसिका धावणार...मैदानातून थेट "रश्‍मी रॉकेट' चित्रपटात "एंट्री' 

घनश्‍याम नवाथे
Tuesday, 15 December 2020

सांगली-  येथील सांगली स्पोर्टस्‌ फाऊंडेशनची राष्ट्रीय खेळाडू रसिका माळी हिने मैदानाबरोबर थेट बॉलिवूडमध्येही धाव घेतली आहे. "रश्‍मी रॉकेट' या हिंदी चित्रपटात ती अभिनेत्री तापसी पन्नूबरोबर झळकणार आहे. गुजरातमधील कच्छ येथील रश्‍मी नामक खेळाडूच्या जीवनपटावर आधारीत हा चित्रपट असून सध्या त्याचे चित्रीकरण सुरू आहे. 

 

सांगली-  येथील सांगली स्पोर्टस्‌ फाऊंडेशनची राष्ट्रीय खेळाडू रसिका माळी हिने मैदानाबरोबर थेट बॉलिवूडमध्येही धाव घेतली आहे. "रश्‍मी रॉकेट' या हिंदी चित्रपटात ती अभिनेत्री तापसी पन्नूबरोबर झळकणार आहे. गुजरातमधील कच्छ येथील रश्‍मी नामक खेळाडूच्या जीवनपटावर आधारीत हा चित्रपट असून सध्या त्याचे चित्रीकरण सुरू आहे. 

दमदार अभिनयाबरोबरच हटके भूमिकासाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाणारी तापसी पन्नू ही सध्या "रश्‍मी रॉकेट' या आगामी चित्रपटासाठी फार कष्ट घेत आहे. महिला खेळाडूवर आधारीत हा चित्रपट असल्यामुळे ती सेटच्या बाहेर घाम गाळत आहे. गुजरातमधील कच्छमधील ग्रामीण भागातील रश्‍मी नामक खेळाडूंने आंतरराष्ट्रीयस्तरावर मजल मारली होती. तिला गावकऱ्यांनी "रॉकेट' असे नाव दिले होते. तिच्या कारकीर्दीवर आधारीत "रश्‍मी रॉकेट' हा चित्रपट आहे. आकाश खुराना त्याचे दिग्दर्शक आहेत. वेगवान धावपटू रश्‍मीची भूमिका तापसी पन्नू साकारत आहे. या चित्रपटाचे काही चित्रीकरण लोणावळा व बाणेर-बालेवाडी येथे झाले आहे. उर्वरीत चित्रीकरण झारखंडमधील रांची येथे होणार आहे. 

या चित्रपटात आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंची "एंट्री' झाली आहे. त्यामध्ये सांगलीच्या रसिका माळीची हिची देखील निवड झाली आहे. रसिका ही सांगलीत एन.डी. पाटील कॉलेजमध्ये बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकते. तर सांगली स्पोर्टस्‌ फाऊंडेशनमध्ये धावणे आणि हेप्टॅथलॉनचा सराव करते. मैदानातून तिने थेट बॉलिवूडमध्ये धाव घेतली आहे. चित्रपटात ती परदेशी खेळाडूच्या भूमिकेत असेल. तापसी बरोबर ती धावणार असून नुकतेच तिला रांची येथील चित्रीकरणासाठी विमानाचे तिकिट पाठवण्यात आले. 19 ते 22 डिसेंबर अखेर तिथे चित्रीकरण असेल. तिथे रिले संघात ती धावेल. 
मैदानाबरोबर चित्रपटातील एंट्रीबद्दल संघटनेचे अध्यक्ष मकरंद चितळे यांनी तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमोद शिंदे, प्रशिक्षक एस.एल. पाटील होते. तिचे चुलते शाहीर देवानंद माळी, आई-वडील, संघटनेचे संजय परमणे, राजू बावडेकर यांचे प्रोत्साहन मिळाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli's Rasika will run with actress Tapsi Pannu. "Entry" in the movie "Rashmi Rocket"