
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सांगली जिल्हा निवड चाचणी स्पर्धा नुकतीच झाली.
सांगली : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सांगली जिल्हा निवड चाचणी स्पर्धा नुकतीच झाली. 26 व 27 फेब्रुवारी रोजी सांगली जिल्हा तालीम संघाच्या विद्यमाने शांतीनिकेतन (सांगली) येथे झालेल्या सांगली जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष व सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहीते यांच्या हस्ते झाले.
तालीम संघाचे उपाध्यक्ष संपतराव जाधव, विलास शिंदे, तालीम संघाचे चिटणीस प्रतापराव शिंदे, संचालक शिवाजी जाधव, राजेंद्र शिंदे, सुनिल मोहिते, मोहन बडरे यांच्यासह राष्ट्रीय पंच हणमंतराव जाधव उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी गादी विभागातूनजिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे मल्ल असे : 57 किलो- निनाद बडरे (आटपाडी), 61 किलो- तेजस पाटील (सूरुल), 65 किलो- नाथा पवार (बेणापूर), 70 किलो- अनिकेत पाटील (बेणापूर), 74 किलो- वैभव शिंदे (बेणापुर), 79 किलो- सागर पवार (पेठ), 86 किलो- अमर पाटील (बिळाशी), 92 किलो- सागर तामखडे (भिकवडी), 97 किलो- सुबोध पाटील (सांगली). महाराष्ट्र केसरी गट अक्षय कदम (बेनापूर)
माती विभाग : 57 किलो- रोहीत तामखडे (भिकवडी), 61 किलो- राहुल पाटील (सुरुल), 65 किलो- इंद्रजित शिंदे (बेणापूर), 70 किलो- मयुर जाधव (चिंचोली), 74 किलो- श्रीकांत निकम (देविखिंडी), 79 किलो- प्रथमेश गुरव (शिराळा), 86 किलो- खशाबा मदने (बेणापूर), 92 किलो- पृथ्वीराज पवार (सांगली), 97 किलो- विनय पाटील (नागठाणे). महाराष्ट्र केसरी गट - सुरज निकम (नागेवाडी)
शांतीनिकेतनचे संचालक गौतम पाटील यांचे स्पर्धेसाठी सहकार्य लाभले. जिल्ह्यातील जुन्या काळातील पैलवान उपमहाराष्ट्र केसरी बाळू मुल्ला यांची शारीरिक स्थिती ठीक नसल्यामुळे व परिस्थिती बेताची असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा तालीम संघाच्यावतीने मदत म्हणून 21 हजार रुपये आर्थिक मदत देत सत्कार व सन्मान करण्यात आला.
विनायक पाटील, नामदेव बडरे, युवराज पाटील, शंकर पाटील, रविंद्र पाटील, धनंजय महाडीक, सुहास पाटील, सुनिल चंदनशिवे, शामराव मासाळ, दिपक पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. ज्योतिराम वाझे, कृष्णा शेंडगे यांनी निवेदन केले.
संपादन : युवराज यादव