संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र घरपोच

हुकूम मुलाणी
बुधवार, 27 जून 2018

मंगळवेढा : तालुक्यातील बोराळे या गावातील तीन लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाल्याचे प्रमाणपत्र घरपोच देण्यात आले. बोराळे येथील पाच मुलींना जन्मास घातलेच्या कारणास्तव बाजीराव दामोदर वाघमारे याने स्वतःच्या पत्नीचा खुन केला होता. त्याला शिक्षा झाली. त्यामुळे सदरच्या पाचही मुली आईवडिलाविना पोरक्या झाल्या. त्यांचा सांभाळ 75 वर्षाचे आजोबा व 64 वर्षाची आजी करित होती. काही दिवसातच आजोबांना सदरच्या लहानलहान मुलींचे हाल पहावेना व त्यांनीही आत्महत्या केली. 

त्यामुळे सर्व मुलींची पालनपोषण करण्याची जबाबदारी आजीवर आली. त्याचसोबत प्रकाश कामण्णा पाटील यांचे गेल्या चार वर्षापुर्वी रेल्वे अपघातात दोन्ही पाय मांडीपासुन तुटले होते तो 100% अपंग झाला व त्यांची आई 70 वय असलेने दोघेही निराधार होते या सर्वाना कोणतेही उपजिवीकेचे साधन नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे तयार करणे यांना शक्य नव्हते. हे लक्ष्यात आल्यावर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी अनुलोम संस्थेच्या पांडुरंग शिंदे यांच्या माध्यमातून निराधार योजना समिती अधिकारी व तलाठी या सर्वाना सांगून पाठपुरावा केला असता त्यास यश आले व आज  मौजे बोराळे येथील जनाबाई दामु वाघमारे ( आजी), प्रकाश कामण्णा पाटील, लक्ष्मीबाई कामण्णा पाटील या तिघांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत प्रकरण मंजुर करुन माहे एफ्रिल व मे महिन्याचे अनुदान खात्यावर जमा झालेचे सांगून पत्र देण्यात आले. 

यावेळी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण नायब तहसीलदार गणेशजी लव्हे अनुलोमचे पांडुरंग शिंदे, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, शहर अध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, अशोक माळी, निराधार योजना अधिकारी पतंगे, वाघमोडे, बोराळे येथील तलाठी बनसोडे, प्रकाश कोरे, सिराज ढालाईत, डॉ म्हमाणे, विश्वनाथ कवचाळे, दत्ता पाटील, कृष्णा धासाडे, ओंकार धणवे, राहुल लाड, शरद पाटील, बबलू ढालाईत, नागेश उपस्थित होते

Web Title: Sanjay Gandhi Niradhar Yojna Certificate of Home