

Minor Held in Professor Murder
Esakal
पलूस येथील पं. विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे (वय ६१, रा. परांजपे, पलूस) यांचा खून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलानेच वादातून परांजपे यांच्याच अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या पार्किंग जागेत डोक्यावर तोंडावर, गळ्यावर व मानेवर टोकदार हत्याराने गंभीर वार करून केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी ४८ तासांत संजय परांजपे यांच्या खुनाचा तपास लावला असून, आरोपी अल्पवयीन मुलास पोलिसांनी बाल न्याय मंडळाने वर्ग केले आहे.