राजू शेट्टींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला - संजय पवार

सागर कुंभार
रविवार, 2 डिसेंबर 2018

रुकडी - शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या निवडणूकीत शिवसेनेने हक्काचा मतदारसंघ राजू शेट्टींं यांना दिला, पण कारखानदारांशी मांडवली करत त्यांनी व त्यांच्या बांडगुळानी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली. तसेच आता शेट्टींचा सेंडआॅफ करण्यासाठी धैर्यशील मानेना बहुजनांचे खासदार करण्याचे आवाहनही श्री पवार यांनी केले. 

रुकडी (ता. हातकणंगले ) येथे शिवसैनिक, माने गट व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित रॅली नंतर झालेल्या बैठकीत श्री पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते.  

शिवसेनेला धैर्यशील माने यांच्या रूपाने उमेदवार मिळाल्याने शिवसैनिकांच्या या भगव्या वादळात 'हातापायाला जखमा दाखवून, पट्टया बांधून फसवणाऱ्याची पळता भुई थोडी होईल.

- मुरलीधर जाधव   

धैर्यशील माने म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी घोषित करून बहुजन समाजाचेे नेतृत्व करणाची संधी दिली.  माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवेन. शरद पवारांनी दहा वर्षे जिल्हा परिषदेत संधी दिली त्यामूळे मी खाल्ल्या घरचे वासे मोजणार नाही.

साताप्पा भवन, संग्रामसिंह कुपेकर, मिलिंद नार्वेकर, सरपंच रफिक कलावंत, उपसरंपच शितल खोत उपस्थित होते.

Web Title: Sanjay Pawar comment