गावगाड्यात सरपंचपदासाठी रस्सीखेच; 9 तारखेला निवड

सचिन निकम
Saturday, 6 February 2021

ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडी (ता. 9) रोजी होणार आहेत. त्यामुळे सरपंचपदी वर्णी लावण्यासाठी गावपुढाऱ्यांच्यात रस्सीखेच सुरु झाली आहे.

लेंगरे (जि. सांगली) : शासनाने लोकनियुक्त सरपंच रद्द करुन सदस्यांतुनच सरपंच निवड पध्दत लागु केली आहे. त्यामुळे सदस्यांना पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या गावगाड्यात महत्व प्राप्त झाले. नुकत्याच पार पडलेल्या तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडी (ता. 9) रोजी होणार आहेत. त्यामुळे सरपंचपदी वर्णी लावण्यासाठी गावपुढाऱ्यांच्यात रस्सीखेच सुरु झाली आहे. तेरापैकी सात ग्रामपंचायतीत महिला राज असणार आहे. परिसरातील चार ग्रामपंचायतीपैकी दोन ग्रामपंचायतीवर पुरुष, तर उरर्वरीत दोन ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे.

त्यामुळे सरपंद आपल्या मिळावे यासाठी नवनिर्वाचित सदस्यांनी नेत्याकडे फिल्डिंग लावली आहे.मात्र सरपंच,उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे मात्र(ता.9) समजणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी सरपंच, उपसरपंच निवडणुक कार्यक्रम जाहीर केला. तसेच नवनिर्वाचित निवडणून आलेले सदस्य पांढरे परीट कपडे घालून फिरु लागले आहेत. तर महिला सदस्याचे पतीच सभापती फिरुन आमचीच खुर्ची असणार असे सांगत गावभर फिरत आहेत.

आरक्षण पडलेल्या प्रवर्गातील सदस्य गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळे सरपंच पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सरपंच, उपसरपंच निवडीचा आराखडा तयार त्यांची जबाबदारी संबंधित मंडल अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

माहुली,नागेवाडी,भिकवडी बु,देविखिंडी सह अन्य नऊ ग्रामपंचायतीत या निवडी होणार आहेत.यामध्ये देविखिंडीत बाबर गट,पाटील गटातील सदस्यांना अडीच अडीच वर्ष सरपंच पदाचे समेट झाल्याने पहिल्यांदा कोणत्या गटाला संधी मिळेल याकडे सदस्यांच्या नजरा लागल्या आहेत.

भिकवडीत पाटील गटाचे,माहुली, नागेवाडीत बाबर गटाचे सरपंच खुर्चीवर बसणार आहेत.या तेरा पैकी सात ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच होणार आहेत.माहुली,नागेवाडी येथे सरपंच पद सर्वसाधारण गटासाठी खुले असणार आहे.देविखिंडी येथील सरपंच पद खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षित आहे.  

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch Selection on 9th Feb in Sangali