
Viral Protest Sarpanch : ‘इथे मी झोपलो नाही; झोपले आहे तासगाव तालुक्याचे प्रशासन! झोपला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग,’ असे म्हणत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील रस्त्यावर गतिरोधक करावा, या मागणीसाठी तुरची (ता. तासगाव) सरपंच विकास डावरे यांनी शाळेचे प्रवेशद्वार आणि रस्ता यामध्ये झोपून अभिनव आंदोलन करून खळबळ उडवून दिली.