Coronavirus : पिलांपासून दुरावलेली आई पुन्हा माघारी येणार तेवढ्यात...

Coronavirus : पिलांपासून दुरावलेली आई पुन्हा माघारी येणार तेवढ्यात...

कलेढोण (जि.सातारा) : आई आजारी पडली म्हणून "ती' पतीला सोबतीला घेऊन माहेरी (मु. पातळी, पो. भोरबाळ, ता. सुरगणा, नाशिक) गेली. प्रवास लांबचा असल्याने पोटच्या तिन्ही गोळ्यांना विखळ्यातील (ता. खटाव) अंगणवाडी सेविकेकडे तिने सोडले. तेही उरावर दगड ठेवूनच. मात्र, तेवढ्यात लॉकडाउन जाहीर झाला आणि चिमुकल्यांकडे येण्याचे तिचे परतीचे दोर कापले. त्यामुळे सूरज, जयवंती व ऋतुजा ही मुलं आई- वडिलांपासून गेल्या 26 दिवस झाले दुरावली आहेत. त्यांची ही वस्तुस्थिती म्हणजे, "लॉकडाउनमुळं... उसवलं गणगोत सारं..!' अशीच आहे.
 
विखळे (ता. खटाव) येथे सात वर्षांपासून आदिवासी समाजातील सखाराम मोतीराम कामडी (मूळ गाव- मु. हातगड, पो. देसगाव, ता. तळवण, नाशिक) हे पत्नी सुलोचनासोबत सालगडी म्हणून काम करत होते. पुढे वाट्याने शेती करीत टोमॅटो, वांगी अशी पिके घेत ते कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. लॉकडाउनपूर्वी सुलोचना यांच्या आई आजारी पडल्याने तिला पाहण्यासाठी त्या आपल्या माहेरी मु. पातळी, पो. भोरबाळ (ता. सुरगणा, नाशिक) येथे 20 मार्च रोजी पतीसोबत गेल्या. सुमारे चारशे- साडेचारशे किलोमीटरचा प्रवास असल्याने त्यांनी पहिलीतील सूरज, तिसरीतील जयवंती व चौथीतील ऋतुजाला अंगणवाडी सेविका सुप्रिया देशमुख यांच्याकडे सोडले. पिलांपासून दुरावलेली आई पुन्हा माघारी येणार तेवढ्यातच राज्यात लॉकडाउन सुरू झाले. 
 
दळणवळणाची सर्व साधने जागच्या जागी ठप्प झाल्याने ही मुले आजअखेर आईपासून दुरावलेली आहेत. आईशी फोनवर बोलताना लहानग्या सूरजच्या डोळ्यांतील पाणी तर पाहवत नाही. हे सांगताना मावशी बनलेल्या सुप्रिया यांच्या डोळ्यातही पाणी उभं राहतं आहे.
 
त्या म्हणाल्या, ""मला दोन मुलं आहेत. मी सूरज, जयवंती व ऋतुजाचा सांभाळ करते. ते माझे कर्तव्य आहे. मात्र मुलं हट्टाने काही मागत नाहीत. देईल त्यात समाधान मानतात. सकाळी रानात जाऊन तीन शेळ्यांना चारापाणी देतात. त्यांच्या शेतातील भाजीपाला पाण्याविना वाळून गेला आहे. मुलांच्या आहारासाठी पोलिस पाटील, सरपंच, पत्रकार, सामाजिक संस्थेकडून मदत मिळत आहे. मात्र आई ही आईच असते. त्यांना गावी येण्याचा प्रशासनाने परवाना द्यावा, हीच मागणी आहे.'' 

अभिनेता हृतिक रोशनच्या या जवळच्या व्यक्तीच्या घरात आढळला कोरोना पॉझिटीव्ह.. संपूर्ण कुटूंबाची झाली कोरोना टेस्ट

पोलिस पाटील भरत देशमुख यांच्याकडून संबंधित कुटुंबाची माहिती समजली. मुलांना हवी ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, सध्या संबंधित मुलांना तेथे जाण्याची व त्यांच्या पालकांना येण्याची सोय करू शकत नाही.
- अर्चना पाटील, तहसीलदार (खटाव) 

 

शेतात गेलेली ही मुलं शेळ्यांना पाणी पाजून खेळतात, बागडतात. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचं खळखळून हसणं आईच्या आठवणीत हरवलं आहे. ते परत यावं म्हणून प्रशासनाने प्रयत्न करावेत. 
- सुप्रिया देशमुख, अंगणवाडी सेविका, विखळे. 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com