सातारकर अनुभवत आहेत बदललेले शिवेंद्रसिंहराजे

सिद्धार्थ लाटकर 
शुक्रवार, 30 मार्च 2018

सातारा - शांत संयमी नेतृत्व म्हणून ओळख असलेले सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जनमाणसातील प्रतिमा आता बदलत चालली आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी मध्यरात्री पासून साताऱ्याच्या रस्त्यांवरील चौका-चौकात साजऱ्या झालेल्या वाढदिवसातून आला. कार्यकर्त्यांच्या उंदड उत्साहात शिवेंद्रसिंहराजे वाहनांच्या ताफ्यांतूनच घराबाहेर डोकावणाऱ्यांना स्मितहास्य करुन वाढदिवसाचे शुभेच्छा स्विकारत होते. अनेक मावळ्यांनी आपल्या लाडक्‍या राजाचा केक कापण्यासाठी तलवारी सज्ज ठेवल्या होत्या.

सातारा - शांत संयमी नेतृत्व म्हणून ओळख असलेले सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जनमाणसातील प्रतिमा आता बदलत चालली आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी मध्यरात्री पासून साताऱ्याच्या रस्त्यांवरील चौका-चौकात साजऱ्या झालेल्या वाढदिवसातून आला. कार्यकर्त्यांच्या उंदड उत्साहात शिवेंद्रसिंहराजे वाहनांच्या ताफ्यांतूनच घराबाहेर डोकावणाऱ्यांना स्मितहास्य करुन वाढदिवसाचे शुभेच्छा स्विकारत होते. अनेक मावळ्यांनी आपल्या लाडक्‍या राजाचा केक कापण्यासाठी तलवारी सज्ज ठेवल्या होत्या. फटाक्‍यांच्या आतषबाजीत, ढोल ताशांच्या गजरात युवा वर्गाच्या अलोट प्रेमाने भारावून गेलेले शिवेंद्रसिंहराजे एकेक चौकांत केक कापून मार्गस्थ होत होते. नागरीकांना आवर्जुन कौटुंबिक माहितीसह ख्यालीखूशाली विचारत होते. तसेच जून्या जाणत्या नागरीकांच्या तोंडून "मेरा राजा बदल रहा है' असे वाक्‍य बाहेर पडत होते. 

त्यांचे चुलत बंधू खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोमिलन तोडल्यानंतर, पालिका निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजे यांचा झालेला पराभव, तसेच कोजागरीच्या रात्री टोल नाक्‍यावरुन झालेल्या सुरुची राडा प्रकरणानंतर शिवेंद्रसिंहराजे बदलले आहेत. शांत संयमी असलेली प्रतिमा आक्रमक झाली हे अनेक प्रसंगातून दिसत आहे. मितभाषी आणि गर्दीपासून काहीसे लांब राहण्याची शिवेंद्रसिंहराजेंची पद्धती होती. हेच राजे आता सरळ गर्दीला भिडतात. आता तर त्यांच्या सुरुची बंगल्यात युवा कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजऱ्या व्हायला लागले आहेत. कार्यकर्त्यांना जवळ घेत त्यांच्या खांद्यावर हात ठेवून शिवेंद्रसिंहराजे सेल्फी देऊ लागले आहेत. कुणी नवी बुलेट, चार चाकी आणली की त्याची पूजा करणे, त्यावरुन रपेट मारणे या गोष्टी देखील यातून सुटत नाहीत. युवा वर्गाप्रमाणे ज्येष्ठ नागरीकांमध्ये ही त्यांची क्रेझ वाढू लागली आहे. ज्येष्ठांचे प्रश्‍न सुटावेत यासाठी ते तत्पर प्रयत्न करीत आहेत. 

अबोल नेता म्हणून संबोधिले जाणारे शिवेंद्रसिंहराजे आता जनेतच्या न्यायासाठी अन्याय करणाऱ्यांना खडे बोल सुनावू लागले आहेत.

Web Title: satara change in shivendra raje bhosale