Coronafighters : 'त्यांचे' मनोबल उंचावण्यासाठी ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 एप्रिल 2020

या वेळी सोशल डिस्टन्सचा वापर करत तोंडाला मास्क लावून ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

मसूर (जि.सातारा) ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रंदिवस लढणाऱ्या पोलिस, आरोग्य, महसूल, ग्रामसुरक्षा दल व ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांचे संचलन येथे झाले. लॉकडाउनच्या कालावधीत सर्वांनी संयमपूर्वक परिस्थिती हाताळत असल्याने त्या घटकांचे मनोबल उंचावण्यासाठी काढलेल्या संचलनावर ग्रामस्थांसह महिलांनी सोशल डिस्टन्स पाळत टाळ्यांची दाद व काही ठिकाणी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.
 
लॉकडाउनच्या काळात पोलिसांसह महसूल, आरोग्य, ग्रामसुरक्षा दल व ग्रामपंचायत यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय काम करत आहे. त्याबद्दल गावात संचलन करण्यात आले. या वेळी सोशल डिस्टन्सचा वापर करत तोंडाला मास्क लावून ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावात रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अजय गोरड, तळबीडच्या सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील, येथील दूरक्षेत्राचे फौजदार पी. एस. जाधव, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, लायन्स क्‍लबचे माजी अध्यक्ष रमेश जाधव, पोलिस, ग्रामपंचायत, आरोग्य, महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जुन्या बस स्थानक चौकातून संचलनास प्रारंभ झाला. युवराज पाटील चौक, बौद्ध वस्ती, व्यापारपेठ, बाजारपेठ, पोस्ट गल्ली मार्गे चावडी चौक, भैरवनाथ गल्ली, ब्रह्मपुरी, खडकपेठ, नवीन बस स्थानक, नवीन गावठाण, संजयनगर वाघेश्वर मार्गाने संचलन करण्यात आले. 

डॉमिनोझ पिझ्झाच्या व्यवस्थापकासह सात जणांवर गुन्हा 

Coronavirus : मुंबईतील सातारकरांनो घाबरु नका; कोरोनाचा संसर्ग राेखण्यास मदत करा

विनामास्क एकत्र आल्याने हनुमानवाडीतील 11 जणांवर गुन्हा 

उंब्रज ः हनुमानवाडीत आंब्याच्या झाडाखाली विनामास्क एकत्र येऊन 11 जणांनी सामाजिक अंतराचे पालन केले नाही. या प्रकरणी संबंधितांवर येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांची माहिती अशी ः हनुमानवाडी गावाजवळच्या पंपहाउसशेजारीच आंब्याच्या झाडाखाली गावातीलच 11 जण विनामास्क एकत्र येऊन बसले होते. त्यांनी सामाजिक अंतराचे पालन न करता कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केले. त्यावरून पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Citizens Welcomed Police Department In Masur