Coronavirus : लोकप्रतिनिधीही घरातच थांबून; दोनच आमदारांनी सुचविली विकासकामे

Coronavirus : लोकप्रतिनिधीही घरातच थांबून; दोनच आमदारांनी सुचविली विकासकामे
Updated on

सातारा : कोरोनामुळे केलेल्या लॉकडाउनचा फटका शासकीय कामांना बसला आहे. विविध शासकीय विभागांकडून होणारी कामे मंजुरीची प्रक्रिया थांबली. त्यामुळे नियोजित विकासकामांसाठी निधी देण्याची प्रक्रिया होऊ शकत नाही. परिणामी जिल्ह्यातील विकासकामांना तूर्त तरी ब्रेक बसला आहे. लॉकडाउन उठल्यानंतर साधारण मे किंवा जूनमध्ये नियोजन समितीकडून निधीचे वाटप होऊ शकणार आहे. 

मार्चमध्ये नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर एप्रिल, मे मध्ये सर्व शासकीय विभाग आपापल्या विभागाशी संबंधित विविध कामांचे अंदाजपत्रक करून ते मंजुरीसाठी नियोजन समितीकडे पाठवितात. त्यानंतर नियोजन समितीकडून निधीचे वाटप होते. त्यानंतर कामांना सुरवात होते. या वर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रसार आपल्या राज्यात व देशात सुरू झाला आहे. परिणामी शासनाने लॉकडाउनचा पर्याय निवडला. त्यामुळे सर्व यंत्रणा जाग्यावरच थांबली आहे. याचा परिणाम शासनाच्या विकासकामांवरही झाला आहे. हा परिणाम जूनपर्यंत राहणार असल्याचे काही अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

जिल्ह्याचा सर्वसाधारण वार्षिक आराखडा 2020-21 साठी 265 कोटींचा होता. त्यामध्ये वाढीव 60 कोटी मिळाल्यामुळे 325 कोटींचा आराखडा झाला आहे. हा निधी वाटप करताना विविध विभागांकडून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांनुसार अंदाजपत्रक केले जाते. मार्च, एप्रिलमध्ये ही प्रक्रिया चालते. त्यानंतर ही कामे मंजुरीसाठी नियोजन समितीकडे येऊन मंजुरी मिळाल्यानंतर निधी वाटप होते. यावर्षी कोरोनामुळे सर्व विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अल्प असल्याने कामे मंजुरीची प्रक्रियाच थांबली आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल झाल्यावरच कामांचे अंदाजपत्रक तयार होऊन ती मंजुरीसाठी नियोजन समितीकडे येतील. त्यानंतर त्यांना निधी वाटप होईल. त्यासाठी मे, जून उजाडणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी नियोजन समितीच्या कामांना ब्रेक लागल्याचे चित्र आहे. 

दोनच आमदारांनी सुचविली कामे 

सध्या माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण या दोघांकडून कामे सुचविल्याचे पत्र नियोजन समितीला मिळालेले आहे. उर्वरित सहा आमदारांकडून कोणतीही कामे सुचविली गेलेली नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधीही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरात थांबून असल्याचे चित्र आहे. 

शेतकऱ्याचा दिलदारपणा दोन टन टोमॅटो मोफत दिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Krishna River pollution after Ganesh Visarjan
Miraj Government Hospital RCC slab collapse
Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Marathi News Esakal
www.esakal.com