ना काम, ना दाम, घराची वाट अजूनही लांब...

ना काम, ना दाम, घराची वाट अजूनही लांब...
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा): विदर्भ, मराठवाड्यासह अन्य ठिकाणांवरून आलेले हे ऊसतोडणी मजूर कारखाना कार्यक्षेत्रात अडकून पडले होते. त्यांची मोठी गैरसोय झाली. त्याचा विचार करून मंत्रालय स्तरावर साखर कारखान्यांच्या परिसरात अडकलेल्या ऊसतोड मजुरांना त्यांच्या घरी सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार त्यांना घरीही सोडण्यात आले. मात्र, त्यातून गुऱ्हाळांवरील काम करणाऱ्या मजुरांना सोडण्याचा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. 

परवड आणि संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला असल्यामुळे त्यांना गेल्या महिन्यापासून बंद असलेल्या गुऱ्हाळांच्या परिसरातच थांबायची वेळ आली आहे. लॉकडाउनमुळे जिल्ह्यांच्या सीमा लॉक आहेत. मजुरांना घरी जाण्यासाठी परवानगी मिळत नाही, असे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यासाठी गुऱ्हाळमालकांनी शासन दरबारी प्रयत्नही केले. मात्र, त्यांना परवानगी मिळाली नाही. कारखान्याचे ऊसतोड मजूर घरी गेले मग गुऱ्हाळांवरील मजुरांवर अन्याय का? हा आर्त सवाल त्यांच्यातून उमटत असून घरी जाण्यासाठी त्यांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. 

गुऱ्हाळांवरील मजूर महिन्यापासून बसून आहेत. त्यामुळे त्यांच्या हाताला काम नसल्याने आणि सरकारकडून त्या कुटुंबांना रेशन मिळत नसल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे लहान मुलांना कसे जगवायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला लवकर घरी सोडावे आणि इकडे आहे तोपर्यंत खाण्याची व्यवस्था होण्यासाठी किमान रेशनिंग तरी द्यावे, अशी मागणी होत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur contractor bribery allegations
Mahayuti Under Strain? Satara-Sangli Election Turns Into a Political Test
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Satej Patil Supports Farmers in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com