फलटणमध्ये युवकाच्या खुनामुळे परिसरात तणाव

संदीप कदम
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

सोनल अहिवळेच्या शरिरावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या जखमा असून त्याचे डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. हे कृत तीन ते चार व्यक्तीनी केल्याचा संशय असून पोलिसांनी तपास प्रक्रीयेला वेग दिला आहे. लवकरच आरोपींनी ताब्यात घेवू असे आश्वासन पोलिस निरिक्षक संदिप शिंगटे यांनी दिले असून त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

फलटण (जि. सातारा) : मंगळवार पेठ (फलटण) येथील सोनल अहिवळे याच्या खून प्रकरणामुळे मंगळवार पेठ परिसरात तणावाचे वातावरण असून उपजिल्हा रुग्णालयात त्याचे नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली आहे.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी सोनल अहिवळे याच्यावर विद्यानगर परिसरात धारधार शस्त्राने हल्ला करुन खून केलाचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. घटनेनंतर सोनल अहिवळेचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष गायकवाड आपल्या सहकार्यांसमवेत शवविच्छेदनाचे काम करत आहेत.

सोनल अहिवळेच्या शरिरावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या जखमा असून त्याचे डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. हे कृत तीन ते चार व्यक्तीनी केल्याचा संशय असून पोलिसांनी तपास प्रक्रीयेला वेग दिला आहे. लवकरच आरोपींनी ताब्यात घेवू असे आश्वासन पोलिस निरिक्षक संदिप शिंगटे यांनी दिले असून त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. तर परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Web Title: Satara news murder in Phaltan

टॅग्स