इमारती अभावी एकाच खोलीत दोन वर्ग भरविण्याची वेळ

संदीप कदम
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

जुन्या इमारतीची पडझड सुरु असून निम्याहुन अधिक प्रमाणात छतावरील कौले नष्ठ झाली आहेत.परिणामी याठिकाणी वर्ग भरविणे बंद करण्यात आले आहे. परंतू  विद्यार्थ्यांचा वावर या ठिकाणी सुरुच आहे.  शेजारील नव्या इमारतीच्या मधोमध जुनी इमारत असल्याने  विद्यार्थी या ठिकाणी जास्त वेळ थांबत असल्याचे दिसून येते

फलटण (जि.सातारा) : मिरेवाडी (ता.फलटण ) येथील जिल्हा परिषद शाळेची जिर्ण व धोकादायक  झालेली इमारत पाडण्यासाठी पंचायत समितीकडून परवानगी मिळत नसल्याने मोठ्या जिवीतहानीचा धोका निर्माण झाला आहे. इमारती अभावी एकाच खोलीत दोन वर्ग भरविण्याची वेळ आली आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत गावात १ ली  ते ४ थी असे वर्ग असून एकूण विद्यार्थी संख्या ३२ आहे. यासाठी जुन्या व नव्या अशा एकूण पाच खोल्या विद्यार्थ्यांना वापरासाठी उपल्बध होत्या .यातील जुन्या इमारतीची पडझड सुरु असून निम्याहुन अधिक प्रमाणात छतावरील कौले नष्ठ झाली आहेत.परिणामी याठिकाणी वर्ग भरविणे बंद करण्यात आले आहे. परंतू  विद्यार्थ्यांचा वावर या ठिकाणी सुरुच आहे.  शेजारील नव्या इमारतीच्या मधोमध जुनी इमारत असल्याने  विद्यार्थी या ठिकाणी जास्त वेळ थांबत असल्याचे दिसून येते. सद्या पाऊसाचा जोर असून अाजुबाजुचा परिसर ओलसर झाला आहे. त्याचबरोबर जुन्या इमारतीच्या भिंतीमध्ये पाणी शिरत असल्याने जिर्ण झालेल्या भिंती धासळू लागल्या आहेत. काल (ता.४) रात्रीच्या सुमारास जुन्या इमारतीचा पाठीमागील भाग पडल्यामुळे गावकरी चिंताग्रत झाले असून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे का असा प्रश्न निर्माण उपस्थित झाला आहे.

गावकर्यांनी वेळोवेळी तक्रार देवुन ही धोकादायक इमारत हटविण्यात आली नाही. त्यामुळे भविष्यात जिवीत हानी झाल्यास प्रशासन त्याची जबाबदारी घेणार का, असा सवाल विद्यार्थांचे पालक करत आहेत

Web Title: satara news: zp school education