चाफळ: श्रीराम मंदिर परिसराची विकास कामे खोळंबली

कृष्णत साळुंखे 
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

श्रीराम मंदिरास शासनाचा पर्यटन व तिर्थक्षेत्राचा "ब"वर्ग दर्जा मिळुन आज चार वर्षे पुर्ण होत आहेत तरीही श्रीराम देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत प्रशासन या दोघांच्या राजकीय चक्रव्युवामध्ये चाफळसाठी दरवर्षी तिर्थक्षेत्राचा शासकीय भरघोस आर्थिक विकास निधी असुनही तो समन्वयाअभावी घेता येत नसल्यामुळे मंदिर व मंदिर परिसरात भाविक व पर्यटकासाठीच्या मुलभुत सुख-सोईंची आजही कमतरता भासत आहे.त्यामुळे येणारे भाविक व पर्यटकामधुन नाराजीचा सुर निघत आहे

चाफळ - ऐतिहासिक धार्मिकतेचे प्राचीन तिर्थक्षेत्र म्हणुन चाफळचे समर्थ स्थापित श्रीराम मंदिरास चार वर्षापुर्वी शासनाने तिर्थक्षेत्राचा "ब"वर्ग दर्जा दिला आहे. त्याच वर्षी दीड कोटींचा विकास निधी आला. त्यातुन प्राथमिक विकास कामे मार्गी लागली मात्र तीन वर्षापासून निधी आलेला नाही. निधीच आला नसल्याने मंदिर परिसराची विकास कामे खोळंबली आहेत. शासनाने निधी देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र येथील देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्यात समनव्य नाही, त्यामुळे  निधी आलेला नाही. 

येथील राम मंदीराची स्थापना १६४८ मध्ये झाली. त्यावेळी ग्रामस्थांच्या सहकार्यांतुन स्थापना झाली. आत्ता ते मंदीर प्रचिन भव्य व दिव्य झाले आहे. त्याकाळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचीही मदत झाली. महाराजांनी मंदिरासाठी १८ बिघे जमीन दान देवुन मंदिराचे कार्य उत्तम ठेवले. १९६७ च्या भुकंपाने जिर्ण झालेल्या मंदिराची पु:नरबांधनी मुंबईचे उद्ध्योगपती अरविंद मफतलाल यांनी केली. येथे दररोज असंख्य भाविक-पर्यटकांची वर्दळ वाढली.त्याचाच परिपाक म्हणुन स्थानिक नेतेमंडळी व तालुकाप्रतिनिधी विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातुन या मंदिरास शासनाचा तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळुन विकास निधी मिळाला. मंदिरास मिळालेल्या पहिल्या वर्षाच्या विकास निधीतुन मंदिराच्या पश्चिम दरवाजा ते विर मारुती मंदिर, मुख्य दरवाजा पुढील रामपेठेत रस्त्याच्या दोंन्ही बाजुस व बस स्थानकाशेजारील पेव्हर ब्लॉकचे काम, बस स्थानक ते मंदिर रस्ता कॉक्रीटीकरण, मंदिरापाठीमागे सुसज्य स्वच्छता गृह,वहान पार्कींगचे सपाठीकरन एवढीच विकास कामे झाली आहेत.पर्यटक व भविकांसाठी इतर मुलभुत सोई-सुविधांची आजही मंदिर परिसरात वानवा आहे. त्यासाठी भरीव आर्थिक निधिची खरी गरज आहे.

श्रीराम मंदिरास शासनाचा पर्यटन व तिर्थक्षेत्राचा "ब"वर्ग दर्जा मिळुन आज चार वर्षे पुर्ण होत आहेत तरीही श्रीराम देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत प्रशासन या दोघांच्या राजकीय चक्रव्युवामध्ये चाफळसाठी दरवर्षी तिर्थक्षेत्राचा शासकीय भरघोस आर्थिक विकास निधी असुनही तो समन्वयाअभावी घेता येत नसल्यामुळे मंदिर व मंदिर परिसरात भाविक व पर्यटकासाठीच्या मुलभुत सुख-सोईंची आजही कमतरता भासत आहे.त्यामुळे येणारे भाविक व पर्यटकामधुन नाराजीचा सुर निघत आहे. त्यामुळे येथिल देवस्थान व ग्रामपंचायत प्रशासनाने आपआपसातील राजकीय हेवेदावे बाजुला ठेवुन भाविक व पर्यटकांच्या मुलभुत सुख-सोईसाठी दरवर्षी शासकीय तिर्थक्षेत्राचा विकासनिधी येण्याची गरज आहे. 

मंदिरातील सेवेकरी पुजारी यांच्या अनेक निवासात नित्य मुलभुत सोई नाहित, त्यांना दिले जाणारे मानधन हे तुटपुंजे असल्याने येथे कायम स्वरुपी पुजारी कोणी राहात नाही, मुख्य मंदिरासभोतालच्या परिसरातील फरशी व्यवस्थीत नाही, शेजारील फुलांच्या बगिच्याची दैनिय अवस्था झाली आहे,वहान पारकिंग साठी सुसज्ज मैदान नाही,बस स्थानकाशेजारील महारुद्र स्वामी समाधी मंदिराची पडझड झाली आहे, नारळीच्या बागेतील नियोजीत  सर्व सोईनियुक्त असे गार्डन व पाळणागृह रखडले आहे,भाविकासाठी अध्यावत चांगले उपहारगृह नाही. याचबरोबर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ यांच्यामध्ये नियोजित विकास आराखड्याबाबत समन्वय नसल्यानेही हा निधी रखडला आहे असे बोलले जात आहे.. 

Web Title: satara newsL ram temple chafal