कोरोनाने नव्हे टंचाईनेही सुकतोय गळा...

कोरोनाने नव्हे टंचाईनेही सुकतोय गळा...
Updated on

आसू (जि.सातारा) : कुरवली खुर्द (ता.फलटण) हद्दीतील तोडकर वस्ती आणि तावडी येथील शाळेशेजारी असलेले असे दोन्ही ट्रान्स्फॉर्मर आठ दिवसांपासून जळाले आहेत. त्यामुळे दोन्ही गावांतील शेतीसह घरातील वीज गायब होऊन ऐन उन्हाळ्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. 

कुरवली खुर्द (ता.फलटण) हद्दीतील तोडकर वस्तीवर महावितरण वीज कंपनीचा ट्रान्स्फॉर्मर आहे. येथून 18 शेतकऱ्यांसाठी घरगुती विजेसह सुमारे दीडशे एकर क्षेत्रासाठी वीज पुरवठा केला जातो. मात्र, या ठिकाणचा ट्रान्स्फॉर्मर गेले आठ दिवसांपूर्वी जळाला आहे.

या ट्रान्स्फॉर्मरवरील जवळपास सर्व शेतकऱ्यांनी वीजबिले भरल्याचे शेतकरी सांगतात. बिले भरली असतानाही गेल्या आठ दिवसांपासून वीज वितरण कंपनी ट्रान्स्फॉर्मर जोडणीत का विलंब करते आहे, याविषयी शेतकऱ्यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे. ऐन उन्हाळ्यात आठ दिवस वीज नसल्याने येथील लोक रात्रंदिवस उकाड्याने हैराण झाले आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतातील पिकेही सुकू लागली आहेत. 

येथील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही भेटले. परंतु, आज, उद्या जोडतो अशी आश्‍वासनांची गाजरे दाखवली जात आहेत. तसेच शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडून संबंधित अधिकाऱ्यांना फोनही केले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी ट्रान्स्फॉर्मर काढून नेला आहे. परंतु, तो अद्याप जोडला गेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

तोडकर वस्ती शेजारच्या तावडी गावातील ट्राट्रान्स्फॉर्मरही जळाला आहे. तेथील नागरिकांचे विजेअभावी मोठे हाल होत आहेत. संबंधितांनी लवकरात लवकर ट्रान्स्फॉर्मरची जोडणी करून शेतकरी आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra IT Park investment project
Atpadi Illegal Sand Mining
Maharashtra Farm Loan Waiver Scheme 2026
How to apply for MHADA Sangli housing?
Marathi News Esakal
www.esakal.com