सातारा शहरात कोरोनाचा शिरकाव; सदरबझारमधील महिला

सातारा शहरात कोरोनाचा शिरकाव; सदरबझारमधील महिला
Updated on

सातारा : संचार बंदीपासून कोरोनाच्या बाधेपासून दूर असलेल्या सातारा शहरामध्ये आज कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एक्‍सरे तंत्रज्ञ महिलेला कोरोना बाधा झाल्याचे समोर आले आहे. संबंधीत महिला सदरबझार परिसरातील आहे. त्यामुळे शहरासह जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 23 मार्चपासून जिल्ह्यामध्ये संचार बंदी लागू झाली. त्यानंतर अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य व्यवसाय व उद्योग व दुकाने बंद करण्यात आली. त्याचबरोबर नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. संचार बंदीनंतर जिल्ह्यामध्ये पहिला रुग्ण आढळला तो खंडाळा तालुक्‍यातील महिला. त्यानंतर कॅलीफॉर्नियावरून आलेल्या खेड परिसरातील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यानंतर निझरे (ता. जावळी) व तांबवे (ता. कऱ्हाड) येथे कोरोना बाधीत आढळले. त्यानंतर जावळी व कऱ्हाडमधील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गेल्या आठ दिवसात दरराजे तीन ते चार रुग्ण पॉझीटीव्ह निघत आहेत. त्यामुळे काल जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 41 वर गेली होती.
 
जावळी व कऱ्हाडमध्ये रुग्ण संख्या वाढत होती त्याचबरोबर फलटणमध्ये दोन रुग्ण सापडले. हे होत असताना सातारा शहरात रुग्ण सापडल्याच्या अफवा दरराजे उठत होत्या. परंतु, कोरोनाची बाधा जिल्ह्यात आल्यापासून महिना झाला तरी शहरामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. शहरात रुग्ण सापडल्याच्या केवळ अफवाच उठाव्या अशी शाहुनगर वासीयांची अपेक्षा होती. परंतु, आज त्याला धक्का बसला. जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका तंत्रज्ञ महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे आज सकाळी समोर आले. तीचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. 

संबंधीत महिला ही जिल्हा रुग्णालयात क्ष किरण तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. कोरोना बाधीत रुग्णांचा एक्‍सरे काढण्याचे काम तीने केले होते. तीला त्रास होऊ लागल्याने घशातील स्त्रावाचे नमुणे घेण्यात आले होते. दरम्यान संबंधीत महिला ही सदरबझार परिसरातील असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधीत महिलेच्या जवळच्या संपर्कात असलेल्यांची माहिती घेऊन त्यांना इंन्सटीट्यूशनल क्वारंटाईन करण्याची प्रक्रीया प्रशासनाने सुरू केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा रुग्ण शहरात सापडल्याची माहिती मिळाल्यामुळे शहरात तसेच संबंधीत रुग्ण ही जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही खडळबळ उडाली आहे. या घटनेची शहरात सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. 

Lockdown2 : मटण, चिकन हवंय येथे फाेन करा

गुड न्यूज : कऱ्हाडकरांना मिळणार घरपोच दूध; त्यासाठी एक फाेन करा

ए भावा...चल घेऊ पुढाकार आपल्या साताऱ्यासाठी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Infrastructure Milestone: Trial Run on the 3.47km Karad Flyover
Marathi News Esakal
www.esakal.com