Video : इंधन दरवाढविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांचे कऱ्हाडात बैलगाडीतून आंदोलन 

Video : इंधन दरवाढविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांचे कऱ्हाडात बैलगाडीतून आंदोलन 

कऱ्हाड ः पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे, कोण म्हणतोय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय., बिचारी जनता करे पुकार, मोदी सरकार, मोदी सरकार, हाय, हाय.. अशा घोषणांनी आज (साेमवार) प्रशाकीय इमारतीचा परिसर दणाणून गेला.

निमित्त होते कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तेथून बैलगाडीतून येथील प्रशासकीय इमारतीसमोर जाऊन केलेल्या आंदोलनाचे. 

पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली आहे. त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप करून कॉंग्रेसच्या वतीने आज येथील प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन केले. तत्पूर्वी आमदार चव्हाण हे येथील दत्त चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून बैलगाडीतून आंदोलनस्थळी आहे.

त्यांच्यासमवेत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कऱ्हाड दक्षिणचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, उत्तरचे हेमंत जाधव, शहराध्यक्ष आप्पा माने, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, इंद्रजित चव्हाण, शिवराज मोरे, राहुल चव्हाण, झाकीर पठाण, राजेंद्र चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी दिलेल्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गडगडले असताना केंद्र सरकारने त्यावर जादा कर लावून पेट्रोल-डिझेलची दरवाढ केल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला. या वेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावरही ताशेरे ओढत दरवाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी केली.

एनडीआरएफच्या टीमची वाट पाहायची वेळ येणार नाही : खासदार श्रीनिवास पाटील

हत्ती गेला अन्‌ शेपूट राहिले, 'यांच्या' कर्जमाफीचे पैसे द्यायचे काेणाला? 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com