esakal | Video : CoronaFighter : कमाॅन मम्मा घरात बसू नकाेस
sakal

बोलून बातमी शोधा

Video : CoronaFighter : कमाॅन मम्मा घरात बसू नकाेस

डॉ. शीतल व डॉ. प्रकाश असे दोघेच त्यांच्या घरी असतात. डॉ. शीतल कधी स्वयंपाक करून जातात. जर कधी त्यांच्याकडून काही काम अडल तर डॉ. प्रकाश ते बिनदिक्कतपणे करतात. यांसह अन्य वेगळ्या माध्यमातूनही डॉ. शीतल कोरोनाशी लढताहेत. त्यांना हातभार लावता येईल तेवढा लावण्याचा ते प्रयत्न करताना दिसतात.

Video : CoronaFighter : कमाॅन मम्मा घरात बसू नकाेस

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड ः ...त्यांच वय 64. पूर्वी त्यांच्या ड्युटीच्या वेळा अगदी ठरलेल्या. कोरोनाशी लढा देताना त्यांच्या वेळा आता अनिश्‍चित झाल्यात. स्वतः हायपर टेन्शनसारख्या आजाराशी दोन हात करताना त्या कऱ्हाडमध्ये कोरोना शिरू नये, यासाठी कार्यरत आहेत. येथील नागरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. शीतल कुलकर्णी या वयाचा विशिष्ट टप्पा गाठल्यानंतरही "कोरोना फायटर' ठरत आहेत. डॉ. कुलकर्णी यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी अल्प मानधनावर नागरी आरोग्य केंद्रात काम करण्याचा स्वीकार केला. 2011 पासून त्या अविरत काम करत आहेत. केवळ दोन कर्मचाऱ्यांवर सुरू झालेले नागरी सुविधा केंद्र सध्या 18 पेक्षा जास्त नर्स, टेक्‍निशियन्स व मदतनीसांसह "कोरोना'ला फाईट देण्यासाठी सज्ज आहे, त्यामागची प्रेरणा डॉ. कुलकर्णी याच आहेत.
 
डॉ. शीतल कुलकर्णी यांना कधीही फोन केला, की त्या त्वरित हजर असतात. सकाळी नऊ वाजता ड्युटीवर येण्याची सरासरी त्यांची वेळ ठरलेली असते. मात्र घरी जाण्याची वेळ निश्‍चित नसते. कधी मध्यरात्री एक, तर त्याहीपेक्षा जास्त काळ त्यांना फिल्ड राहून काम करावे लागते. सध्याच्या घडीला कऱ्हाडातील सुमारे 80 हजार लोकांचा सगळा डाटा त्यांच्याकडे आहे. 74 हजारहून अधिक घरांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यात चार हजार 889 ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणी करून त्यातील 252 लोकांना एक महिन्याची औषधे त्यांनी घरपोच करण्यास सुरवात केली आहे. कोरोनाशी फाईट देताना वयाचेही भान डॉ. कुलकर्णी यांना नाही, इतकी ऊर्जा घेऊन त्या स्वतः काम करतात. त्याशिवाय आरोग्य सेविका अन्‌ आशा स्वयंसेविकांनाही काम करण्याची प्ररेणा देतात. 


आई कोरोनाशी फाईट दे 

डॉ. शीतल यांचे पती डॉ. प्रकाश कुलकर्णी हेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना एक मुलगा असून, ते कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत. सध्या ते त्यांच्या कुटुंबासह कॅनडात स्थायिक आहेत. आई- वडिलांशी ते मोबाईलवर संपर्कात असतात. मुलानेही आई "कोरोना'ची साथ सुरू आहे. त्याच्याशी फाईट दे, नागरी सुविधा केंद्र सोडून घरी बसू नको, असे सांगून मला नागरी आरोग्य केंद्रात काम करण्यास प्रेरणा दिल्याचे डॉ. शीतल आठवणीने सांगतात. 

कोरोनाशीही दोघांचा लढा 

कोरोनासाठी डॉ. शीतल रात्री अपरात्रीसह दिवसा कधीही तयार असतात. अनेकदा त्या घरी येतात न तोच त्यांना त्वरित परतावे लागते. काल तर पहाटे चार वाजेपर्यंत त्या काम करत होत्या. परराज्यातून आलेल्या लोकांना त्यांनी विलगीकरण कक्षात ठेवले. त्या वेळी त्यांचे पूर्ण चेकअपही केले. डॉ. शीतल व डॉ. प्रकाश असे दोघेच त्यांच्या घरी असतात. डॉ. शीतल कधी स्वयंपाक करून जातात. जर कधी त्यांच्याकडून काही काम अडल तर डॉ. प्रकाश ते बिनदिक्कतपणे करतात. यांसह अन्य वेगळ्या माध्यमातूनही डॉ. शीतल कोरोनाशी लढताहेत. त्यांना हातभार लावता येईल तेवढा लावण्याचा ते प्रयत्न करताना दिसतात. कोरोनाच्या रुग्णांची माहिती ठेवण्यासाठी डॉ. प्रकाश यांनी त्यांना एक वेगळी पद्धत सांगितली आहे. त्याचा वापर केल्याने संगणकावर एका क्‍लिकमध्ये डॉ. शीतल यांना सगळी माहिती एकत्रित मिळत आहे. 

Video : CoronaFighter एसपींची मूलगी का रडली ?

CoronaFighters : ते नेहमीच आमच्यासाठी जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावतात

loading image
go to top