काय सांगता ! दारू दुकानच "अनलॉक' व्हयं

काय सांगता ! दारू दुकानच "अनलॉक' व्हयं
Updated on: 

कलेढोण : मायणी तालुका खटाव येथील मायणी- वडूज रोडवर मुख्य चौकालगत असलेल्या सुरेश घोणे यांच्या देशी दारूच्या दुकानातील 57 दारू बॉक्‍समधील एक लाख 42 हजार 782 रुपयांची दारू तळिरामांनी चोरून नेली. याबाबत मायणी पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत फिर्याद देण्याचे काम सुरू होते.
 
याबाबत कोरेगाव दारूबंदी उत्पादन शुल्क व दुकान मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार मायणीच्या मुख्य चौकात सुरेश घोणे यांचे दुकान दुय्यम निरीक्षक दारूबंदी व उत्पादन शुल्क कोरेगाव यांनी ता. 21 मार्च रोजी सील केले होते. त्यानंतर मायणी व परिसरातील तळिरामांची गोची झाली होती. अखेर दारूची तलफ भागविण्यासाठी चोरट्यानी लॉकडाउनमध्ये दारूचे दुकान फोडून अनलॉक केले. रात्री मायणीत पहारा देणाऱ्या गुरखामार्फत पोलिस पाटील यांना घोणे यांच्या दुकानात चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर पोलिस पाटील यांना चोरटे दिसूनही आले. त्यांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे दोन दुचाकीवर पलायन करण्यात यशस्वी झाले. त्यानंतर दुकान मालक घोणे यांनी दुकानात हजेरी लावल्यानंतर चोरट्यांनी दुकानातील छताचा पत्रा उचकटून व शिडीच्या मदतीने दुकानात प्रवेश केला.

त्यानंतर दुकानातील एकूण 57 बॉक्‍स चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यात 750 मिलीच्या 46 हजार 764 रुपयांच्या 216 बाटल्या, 180 मिलीच्या 90 हजार 740 रुपयांच्या 1745 बाटल्या व 90 मिलीच्या पाच हजार 278 रुपयांच्या 203 बाटल्या असा एकूण एक लाख 42 हजार 782 रुपयांचा माल पळवून नेल्याची माहिती महेश गायकवाड दुय्यम निरीक्षक दारूबंदी व उत्पादन शुल्क कोरेगाव यांनी दिली. सदर घटनेची फिर्याद दुकानमालक रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

या चोरीत एकूण दारूचे 57 बॉक्‍स चोरीस गेले असून, एकदम एवढे बॉक्‍स कसे काय नेले? हा प्रश्‍न उपस्थित झाल्यावर गेल्या काही दिवसांपासून ही चोरी सुरू असावी, असा अंदाज पोलिस व प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त केला जात आहे.

Video : फॅन्टास्टिक; बाळाने आणि आज्जीने धुडकाविले त्याला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Sunil patil and Sonali Avati
Marathi News Esakal
www.esakal.com