घरात अवतरले ‘जंगलबुक; संतोष जाधव यांचा पर्यावरणपूरक देखावा

घरात अवतरले  ‘जंगलबुक; संतोष जाधव यांचा पर्यावरणपूरक देखावा
Updated on

कोल्हापूर - ‘जंगल जंगल बात चली है पता चला है... चड्डी पहनके फूल खिला है....या गाण्याची धून अनेक वर्षे बालकांना टीव्हीकडे आकर्षित करून घेत होती. परंतु, सध्या सुर्वेनगर परिसरातील संतोष जाधव यांच्या घरातून या गाण्याचे संगीत ऐकू येत असून, आसपासच्या परिसरातील मुले आणि विद्यार्थी त्यांच्या घराकडे धाव घेत आहेत. जाधव यांनी आपल्या छोटेखानी घरात सादर केलेला जंगल बुक (मोगली) हा हालता देखावा बालकांचेच नाही तर सर्व वयोगटातील नागरिकांना आकर्षित करून घेत आहे.

गणेशोत्सवातील देखावा आणि बघण्यास प्रेक्षकांची गर्दी हे समीकरण केवळ सार्वजनिक गणेशोत्सवात दिसून येते; पण सुर्वेनगर परिसरातील दत्तभागीरथी नगरमधील संतोष जाधव यांनी घरातील गणेशोत्सवात जंगल बुक तथा मोगली हा हालता देखावा केला आहे. 

जंगल बुकमधील मोगली या नायकाप्रमाणे शेरखान, बगिरा, भालू, अक्रू आदी प्राण्यांची हजेरी या देखाव्यात दिसत आहेत. धबधबा आणि पाण्यात विहार करणारे हत्ती, आणि जंगल विहार करणारे प्राणी आणि झाडावरून फिरणारा मोगली असा देखावा मांडला आहे. विशेष म्हणजे, हा देखावा जंगल बुकच्या गाण्याच्या धून ऐकत पाहण्यासाठी आसपासच्या बालकांचीच नव्हे तर शाळेतील मुलांचीही गर्दी होत आहे. 

उद्यमनगरमधील एका खासगी कंपनीत काम करणारे संतोष जाधव यांचे घरी देखावा करण्याची अनेक वर्षाची जणू परंपराच आहे. यापूर्वी व्हाईट टेंपल, सुवर्ण मंदिर आदी मंदिरे आणि धबधब्यांच्या प्रतिकृती केल्या होत्या. यंदा काहीतरी पर्यावरणपूरक वेगळे करण्याच्या हेतूने त्यांनी हा देखावा केला असून, रद्दी आणि पुठ्याचे डोंगर, काथ्यापासून केलेले गवत अशा प्रकारे मांडणी केलेला देखावा आकर्षण ठरत आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nipani NH48 flyover wall collapse investigation
Best places to visit in Kadegaon during monsoon
Kadegaon farmer loan waiver scheme 2026 beneficiary list
Krishna River water level in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com