बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळकरी मुलं पाजतात पाणी

School children provide water for the students of XII
School children provide water for the students of XII
Updated on

श्रीगोंदे : बारावीच्या परीक्षेत शाळकरी मुलांना चक्क कामाला जुंपले असून, याबद्दल सगळेच कानावर हात ठेवत आहेत. परीक्षार्थींना पाणी देण्यासाठी बोर्डाने तुटपुंज्या मानधनाची लालूच दाखवून कर्मचारी नेमण्याची सूचना केली; मात्र येथील अनेक केंद्रांवर हे कर्मचारी म्हणजे शाळकरी मुले आहेत. पाणी देण्यासोबतच त्यांनी वर्गातील कॉप्या जमा करून त्याचे गाठोडे बाहेर टाकण्याची दुहेरी जबाबदारीही त्यांच्यावर आहे. 
शहरातील एका परीक्षा केंद्रावर ही बालकामगारांची व्यथा अनुभवायला मिळाली. अर्थात, हे सर्वत्रच असून, राज्यातील परीक्षा केंद्रांवर शाळकरी मुलेच पाणीवाटपाचे काम करतात, अशी सारवासारवही करण्यात आली. तालुक्‍यातील चार केंद्रांवर तीन हजार 25 परीक्षार्थी आहेत.

शंभर परीक्षार्थींमागे पाणी वाटणारा एक कर्मचारी नेमण्याची सूचना परीक्षा बोर्डाने दिलेली आहे. मात्र, त्यासाठी एका दिवसाला केवळ तीस रुपये मानधन मिळते. त्यामुळे कर्मचारी तेथे काम करीत नसल्याने केंद्रावरील महाविद्यालयांची अडचण होते. त्यामुळे मध्यम मार्ग म्हणून संबंधित संस्था त्यांच्या विद्यालयातील पाचवी ते आठवीत शिकणाऱ्या चिमुकल्यांना या कामासाठी जुंपते. 


परीक्षार्थींना पाणी देतानाच वर्गात असणारे कॉप्यांचे कागद वर्गाबाहेर टाकण्याची जबाबदारीही त्यांचीच असल्याचे लक्षात आले. या मुलांकडे विचारणा केली असता, ते आठवीत शिकत असून, मुख्याध्यापकांनी सांगितल्याने ते शाळा बुडवून परीक्षा केंद्रावर हजेरी लावतात, असे समजले. इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी तर परीक्षार्थींची संख्या जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात असे "वॉटर बॉय' नेमलेले होते. सध्या तालुक्‍यात अशी तीस मुले रोज या कामावर जुंपलेली आहेत.

बारावीच्या परीक्षा बोर्डाने घालून दिलेल्या आचारसंहितेत स्पष्टपणे सांगितले आहे, की संस्था अथवा महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनाच हे काम द्यावे. मात्र, शिपाई हे काम करीत नसल्याने मुलांना अशा कामावर ठेवल्याचे समजले. 
दरम्यान, संबंधित परीक्षा केंद्राच्या "चीफ कंडक्‍टर' यांना विचारले असता त्यांनी, "तुटपुंज्या मानधनावर कर्मचारी मिळत नाहीत,' असे सांगितले. 


पाणीवाटप करण्यासाठी शाळकरी मुले ठेवू नयेत, अशा स्पष्ट सूचना केंद्रांना दिल्या आहेत. तरीही तसे प्रकार होत असतील, तर संबंधितांना सक्त ताकीद देऊ. 
- जी. जी. सय्यद, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, श्रीगोंदे 

माठासाठी 25 रुपयांची तरतूद 
परीक्षा बोर्डाने परीक्षेदरम्यान पाण्याचा माठ आणण्यासाठी पंचवीस रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, पंचवीस रुपयांत माठ मिळत नाही. शिवाय, परीक्षा झाल्यावर तो मातीचा माठ विकण्याच्या सूचना दिल्याची माहिती केंद्रावर समजली. बोर्डाच्या अशा तुटपुंज्या मानधनामुळे केंद्रचालकांचा नाइलाज होतो, अशी विचित्र माहितीही समजली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com