या शाळेत विद्यार्थी आहेत, पण शिक्षक नाहीत! 

या शाळेत विद्यार्थी आहेत, पण शिक्षक नाहीत! 
Updated on: 

तासगाव : शाळेत विद्यार्थी आहेत पण शिक्षक गायब असा प्रकार आज तासगाव नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळा न 9 मध्ये उघडकीस आला. दरम्यान या प्रकाराची तक्रार आल्यावर तातडीने दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी शाळेत नसलेल्या शिक्षकांना खुलासा मागवला आहे.

टेंपररी शिक्षक उपस्थित आणि कायम शिक्षक गायब असा प्रकार तासगाव नगरपालिकेच्या शाळांमध्ये अनेकदा दिसतो. आज तासगाव पाळीमेच्या संत तुकाराम महाराज प्राथमिक शाळा न 9 मध्ये हा प्रकार उघडकीस आला. या शाळेतील काही शिक्षकच शाळेत शिकवत असल्याचे लक्षात आल्यावर सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे आणि काही नागरिकांनी शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापक काही कामानिमित्त बाहेर, चार शिक्षकांपैकी दोन गायब आणि दोन कायम शिक्षक आणि दोन करार पद्धतीने घेतलेले शिक्षक शिकवत असल्याचे निदर्शनास आले.

हा प्रकार शाळा समिती नगरपालिका शिक्षण समिती सदस्यता तथा नगरसेविका प्रतिभाताई लुगडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. त्यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी लगेच त्याची शहानिशा करून अनुपस्थित शिक्षकांना त्याबाबत खुलासा मागितला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी हालचाल रजिस्टमध्ये आपण ज्या कामानिमित्त बाहेर जात आहे त्याची नोंद केली होती. अनुपस्थित शिक्षकांनी अशी कोणतीही नोंद केली नव्हती. विशेष म्हणजे अनुपस्थित शिक्षक तक्रार झाल्यानंतर लगेच हजर झाले. आज गैरहजर असलेला एक शिक्षक त्या आधीही एक दिवस गैर हजर होता. एकूण या प्रकरणामुळे तासगाव शहरातील नगरपालिका शाळांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

शाळेच्या मुख्याध्यापकांशिवाय या शाळांवर सध्या कोणाचेच नियंत्रण नाही. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी काय कारवाई करणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com