संकलित मूल्यमापनासाठी शाळास्तरावर प्रश्‍नपत्रिका

संकलित मूल्यमापनासाठी शाळास्तरावर प्रश्‍नपत्रिका

सोलापूर : यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये होणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणीच्या प्रश्‍नपत्रिका या शाळास्तरावर काढण्यात येणार आहेत. यापूर्वी राज्यस्तरावरुन प्रश्‍नपत्रिका शाळांना दिल्या जात होत्या. मात्र, विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती वेगवेगळी असल्यामुळे विद्या प्राधिकरणाने असा निर्णय घेतला आहे.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे अभियान राबविले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार देशात आपले राज्य शैक्षणिक क्षेत्रात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आणायचे आहे. त्यादृष्टीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रची निर्मिती केली आहे. त्यामुळे मागील दोन-तीन वर्षापासून पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात येत होती. यंदाची पायाभूत चाचणी ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली आहे. त्यानंतर आता संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या प्रश्‍नपत्रिका या राज्यस्तरावरुन येणार नाही. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी घेतली जाते. राज्यस्तरावरुन प्रश्‍नपत्रिका येत असल्याने त्याच्या नियोजनामध्ये मोठ्या त्रुटी असल्याचे मागील वर्षी सिद्ध झाले होते. 

राज्यातील अनेक शाळांना वेळेवर प्रश्‍नपत्रिका मिळत नव्हत्या. त्यामुळे यंदाच्या वर्षीपासून संकलित मूल्यमापन चाचणीसाठी शाळास्तरावर प्रश्‍नपत्रिका काढण्याचा निर्णय विद्या प्राधिकरणाने घेतल्याचेही बोलले जाते. ऑगस्ट महिन्यात झालेल्या पायाभूत चाचणीचे गुण "सरल' प्रणालीमध्ये भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. विद्यार्थ्यांचे गुण "सरल'मध्ये भरल्यानंतर शिक्षकाला त्याच्या वर्गाचा संबंधित विषयाचा निकाल, अध्ययन निष्पत्ती निहाय वर्गाची संपादणूक "सरल'मध्ये उपलब्ध आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे शिक्षकांना सोपे होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती निहाय संपादणूक समजल्याने शिक्षकांना त्यानुसार विद्यार्थ्यांना अध्यापन करणे सोपे जात आहे. याचा विचार करूनच संकलित मूल्यमापन चाचणीच्या प्रश्‍नपत्रिका शाळास्तरावर काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

अमरावतीची वापरा प्रश्‍नपेढी 
या चाचणीसाठी प्रश्‍नपत्रिका काढताना विद्या प्राधिकरण अमरावती यांनी तयार केलेल्या प्रश्‍नपेढीचा उपयोग संदर्भासाठी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्‍नपेढी तयार केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com