शालेय पोषण आहार पॅकिंग तारखेशिवाय...काही धान्य निकृष्ट असल्याच्या शिक्षण विभागाकडे तक्रारी 

दिलीप क्षीरसागार 
Wednesday, 30 September 2020

कामेरी (जि. सांगली)-   शासनाच्यावतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेतून वाटप करण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजन आहारातील मूगडाळ व हरभरा पॅकिंगवर तारीख नाही. हा आहार पॅकिंग केल्यापासून तीन महिने व सहा महिने उपयोगात आणावा असे नमूद केले आहे. शासनच पॅकिंगची तारीख देत नसेल इतरांचे काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

कामेरी (जि. सांगली)-   शासनाच्यावतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेतून वाटप करण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजन आहारातील मूगडाळ व हरभरा पॅकिंगवर तारीख नाही. हा आहार पॅकिंग केल्यापासून तीन महिने व सहा महिने उपयोगात आणावा असे नमूद केले आहे. शासनच पॅकिंगची तारीख देत नसेल इतरांचे काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजना लागू आहे. योजने अंतर्गत शाळेतील शालेय पोषण आहार शिजवून दिला जात असे. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद असल्याने पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना वाटप केले जाते. वाटपासाठी येणाऱ्या धान्याचा करार शासन व ठेकेदारात शासनस्तरावर झालेला असतो. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी धान्य वाटपासाठी दिले जाते. तपासणीसाठी प्रयोगाळेकडे पाठवले जाते. शाळांना वाटपाबाबत सूचित केले जाते. लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. धान्य शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना द्यावे, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. त्यानुसार शाळा पालकांना बोलावतात.

पहिली ते पाचवीसाठी 600 ग्रॅम मुगडाळ, 1200 ग्रॅम हरभरा, तांदूळ 3 किलो 400 ग्रॅम, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 900 ग्रॅम मूगडाळ, 1800 ग्रॅम हरभरा डाळ व तांदूळ पाच किलो 100 ग्रॅम याप्रमाणे वाटपाचे नियोजन आहे. या आहारात मिळणाऱ्या मूगडाळ, हरभराडाळ यातील काही पिशव्यात धान्य निकृष्ट आहे. त्याचबरोबर तर धान्याच्या पॅक पिशवीवर पॅकिंग केल्यापासून मूगडाळ तीन, हरभराडाळ सहा महिन्यात वापरावी, असे नमूद केले आहे. मात्र शासनाने पॅकिंगवर तारीख टाकलेली नाही. अशा पिशव्या वाटल्यास कशा ? असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. 

""शासन स्ततरावर धान्यपुरवट्याचा करार झालेला असतो. एजन्सीमार्फत येणारे धान्य प्रयोगशाळेकडे पाठवले जाते. करारानुसारच्या त्रुटी व शाळांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कारवाईचा अधिकार जिल्हास्तरावर नाही. तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत शिक्षण संचालक (पुणे) यांच्याकडे पुढील कार्यवाईसाठी सादर केल्या आहे.'' 

-सुनंदा वाखारे, 
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. सांगली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School nutrition food without packing date. Complaints to the education department that some grains are inferior