ट्रॅक्टर चालक पळून गेला आहे. घटनास्थळी अथणी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. शासकीय दवाखान्यांमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
अथणी : शाळा सुटल्यानंतर सायकलने घराकडे जात असलेल्या मुलाच्या अंगावरून ट्रॅक्टर (Tractor Accident) गेल्याने तो ठार झाला. तंगडी (ता. अथणी) येथे ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. अनिरुद्ध भानुदास पाटील (वय ११) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.