
शेवगाव : धान्यसाठा पडताळणी अहवाल सादर न केलेल्या व मूळ परवानाधारकांऐवजी कायदेशीर ठराव नसलेल्या व्यक्तीस अनधिकृतपणे दुकान चालविण्यास दिलेल्या शहरातील पाच स्वस्त धान्य दुकानदारांवर जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी कारवाईचा बडगा उगारला. अचानक तपासणी केलेली पाचही दुकाने "सील' करण्याचा आदेश तहसीलदारांना दिला.
पुरवठा निरीक्षक पवन बिघोत, नायब तहसीलदार मयूर बेरड यांच्या पथकाने काल (शनिवारी) सायंकाळी ही दुकाने "सील' केली.
हेही वाचा - कोरोनाने अवघे कुटुंबच बाधले
सिंधूबाई आल्हाट- अंबादास खंडागळे, एम. आर. भंडारी- मनोज गुजर, डी. बी. बिहाणीद्वारे प्रकाश गजभीव- प्रीतम नाईक, शेख मतीन, प्रकाश गजभीव यांचा त्यांत समावेश आहे.
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याची शहानिशा करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी माळी, पुरवठा निरीक्षक अभिजित वांढेकर, पुरवठा निरीक्षक विजय उमप यांनी शुक्रवारी दुकानांची तपासणी केली. त्यात दुकानांचा साठा पडताळणी अहवाल सादर न करणे, तसेच तपासणीदरम्यान बहुतांश स्वस्त धान्य दुकाने मूळ परवानाधारकाऐवजी कायदेशीर ठराव नसलेल्या त्रयस्थ व्यक्ती चालवीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शहरातील पाचही स्वस्त धान्य दुकाने "सील' करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.