प्रशासन परदेशातून आलेल्यांचा मागावर! गावनिहाय पथके केली तैनात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

 गावनिहाय स्थापन करण्यात आलेल्या पथकात चार लोकांचा समावेश आहे.  शेवगाव-पाथर्डी मिळून 202 ग्रामपंचायती आहे. त्यानुसार 202 पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

नगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून विदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यासाठी गावनिहाय अंगणवाडीसेविका, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांचे पथके तयार करण्यात आली आहे.  

या दरम्यान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शेवगाव-पाथर्डीचे प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी दिली. 

केकाण म्हणाले, गावनिहाय स्थापन करण्यात आलेल्या पथकात चार लोकांचा समावेश आहे.  शेवगाव-पाथर्डी मिळून 202 ग्रामपंचायती आहे. त्यानुसार 202 पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

या पथकाने वाडी वस्तीवर जाऊन विदेशातील, बाहेरील जिल्ह्यातील कोणी व्यक्ती आला असेल, त्याची माहिती घेणे. एखाद्या व्यतीत कोरोनासंदर्भात काही लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करावी, आवश्यकता भासल्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येईल, अशी आदी कामे पथकाद्वारे करण्यात येणार आहे.

जनजागृतीबाबत सोशल मीडिया, सामाजिक संस्था, देवस्थानातील वाहने यांच्यातर्फे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृतीही करण्यात येत आहे. कोरोनासंदर्भात परिस्थिती गंभीर असली, तरी शासन, प्रशासन खंबीर आहे.

जनतेला कळकळीची विनंती आहे, की कृपया कोणीही घराच्या बाहेर पडू नये, गर्दी करू नये, स्वतःची, आपल्या परिवाराची काळजी घ्या, वारंवार सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही केकाण यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The search for people from abroad started