सांगली : शासनाकडून विद्यार्थ्यांना दुसरा शालेय गणवेश डिसेंबरअखेर देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले तरी दुसरा गणवेश न मिळाल्याने नाराज असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे. .Bunty-Babli arrest : घरफोडीच्या गुन्ह्यातील ‘बंटी-बबली’ अटकेत.प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले की, शासनाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जातात. मात्र यंदा त्याचे नियोजन राज्य पातळीवरुन करण्यात आले. त्यामध्ये पहिला गणवेश थेट शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळाला. मात्र या गणवेशामध्ये त्रुटी आढळल्या आहेत. एकाच मापाचे गणवेश देण्यात आल्याने मापावरून गोंधळ उडाला. काही विद्यार्थ्यांसाठी हे गणवेश गैरसोयीचे ठरले आहेत. दुसऱ्या टप्प्यात या त्रुटी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे..पहिल्या गणवेशाचा गोंधळ झाला, तर दुसरा गणवेश पहिले सत्र संपून दुसरे सुरू झाले तरी अद्याप मिळालेला नाही. पहिला गणवेश थेट पुरवण्यात आला. मात्र मापाचा गोंधळ झाल्याने शासनाकडून कापड पुरवण्यात आले आहे. मात्र शिवणकाम कोणी करायचे, याचा नवाच गोंधळ सुरू आहे. शासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने कटिंग केलेले कापड पुरविले. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची गोची झाली आहे..मोहन गायकवाड यांनी सांगितले, दुसऱ्या गणवेशाचे कापडच शासनाकडून ऑक्टोबरमध्ये मिळाले. त्यामुळे गणवेश वितरणात विलंब झाल्याचा दावा खरा नाही. या गणवेशांचे महिला बचत गट, माविम (महिला आर्थिक विकास महामंडळ) यांच्याकडून शिलाईकाम करून घेतले जाणार आहे. त्यासाठी प्रतिगणवेश ११० रुपये मेहनताना दिला जाणार आहे. जिल्हा व तालुकास्तरावरील सक्षम बचत गटांना शिलाईचे काम दिले जाणार आहे. त्यासाठी पारदर्शीपणे प्रक्रिया पार पाडली जाईल. मात्र काहीजण गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत..Kashmiri Saffron : काश्मीरच्या ‘केशर’चा राहुरीत दरवळ! चिंचकर दाम्पत्यांच्या नव्या प्रयोगाला उभारी.कामवाटपासाठी समितीमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गणवेश शिलाईचे काम वाटप करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. या समितीमध्ये शिक्षणाधिकारी, समाजकल्याण अधिकारी व अन्य सदस्य आहेत. बचत गटाची क्षमता तपासून त्यांना काम दिले जाईल. शाळा व्यवस्थापन समितीची त्याला मान्यता घेतली जाणार आहे. डिसेंबरअखेर सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.