esakal | कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर : जयंत पाटील

बोलून बातमी शोधा

Second wave of corona more serious : Jayant Patil

कोरोनाची दुसरी लाट गंभीर आहे. निर्बंध संयमाने आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सांगली जिल्हा वासीयांनी साथ द्यावी, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केले. 

कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर : जयंत पाटील
sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली ः कोरोनाची दुसरी लाट गंभीर आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत उपचारांसाठीची सर्व रुग्णालय पुन्हा एकदा सज्ज ठेवावीत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध संयमाने आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सांगली जिल्हा वासीयांनी साथ द्यावी, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केले. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, झेडपीचे सीईओ जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे उपस्थित होते. 


पालकमंत्री पाटील म्हणाले,""कोविडच्या पहिल्या लाटेत उपचारांसाठीची सर्व हॉस्पिटल्स पुन्हा एकदा सज्जा ठेवा. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक गंभीर असून वेगाने वाढत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशा प्रमाणात बेड्‌स, औषधे व ऑक्‍सिजन यांचा साठा उपलब्ध ठेवावा. कोविड उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा 5 टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार असून यातून कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी आवश्‍यक उपाययोजना कराव्यात. 


पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने दैनंदिन असणारी रुग्णसंख्या, सद्य:स्थितीत उपचाराखाली असणारे रुग्ण, चिंताजनक रुग्ण, कोरोना उपचारांच्या ठिकाणी उपलब्ध असणारा ऑक्‍सिजन साठा, पुरवठा, रेमडिसीव्हीरची उपलब्धता व अन्य औषधांची उपलब्धता आदी सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला. कोविड उपचार सुरू असणाऱ्या ठिकाणी आणि परिसरात सीसीटीव्हीची यंत्रणा ठेवावी, असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले. 

चांदोलीत ब्रिंडिंग केअर सेंटर उभारणार 
सांगली शहरात बिबट्या शिरला याबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांना विचारले असता ते म्हणाले,""बिबट्या शहरात सापडला ही आश्‍चर्यकारक गोष्ट आहे. आम्हाला यापुढे वनखात्याकडेही लक्ष द्यावे लागेल. बिबटे जंगलाबाहेर पडणार नाहीत यासाठी चांदोलीत ब्रिडिंग आणि केअर सेंटर उभा करणार आहे. जंगलातील प्राण्यांची जंगलातच रहावे, त्यांनी शहरात येणे घातक आहे. अशा सेंटरसाठी मी स्वतः चांदोली धरणात जावून जागांची पाहणी केली आहे. 

पालकमंत्री पाटील म्हणाले... 

  •  कोरोना प्रादुर्भाव कमीसाठी लस घेणे मूळ उपाय. 
  •  45 वर्षांवरील सर्वांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. 
  •  जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लसीकरण. 
  •  प्रति दिवस 15 हजारांपर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न. 

संपादन : युवराज यादव