esakal | या संगमनेरला 50 लाखांचा घोडा बघायला... 
sakal

बोलून बातमी शोधा

sangamner hourse dance

अश्‍वपालन हा महागडा छंद असल्याने, या फंदात फारसे कोणी पडत नाही. मात्र गेल्या काही वर्षात महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी या छंदाला पुर्नजीवीत केले आहे.

या संगमनेरला 50 लाखांचा घोडा बघायला... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः अश्वपालनाचा छंद संगमनेर तालुक्‍यात अद्यापि जपला जातो. तालुक्‍यातील देवगड येथे जातीवंत घोड्यांचे प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनामुळे संगमनेर तालुक्‍याचा डंका राज्यात गाजत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी केले. तालुक्‍यातील हिवरगाव पावसा ( देवगड ) येथे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती व संगमनेरमधील अश्‍वप्रेमी असोशिएशनच्या वतीने आयोजीत केलेल्या अश्‍व स्पर्धा व पशुपालन प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, अश्‍वपालन हा महागडा छंद असल्याने, या फंदात फारसे कोणी पडत नाही. मात्र गेल्या काही वर्षात महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी या छंदाला पुर्नजीवीत केले आहे. यादवांपासून मोगल, मराठा साम्राज्य व पेशवाईचा समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या तालुक्‍यात, पुन्हा अश्वपालनात चांगली प्रगती झाली असून, दिवसेंदिवस या छंदाचे आकर्षण वाढते आहे. प्रदर्शनातील विविध गुणांनी युक्त जातीवंत अश्वांच्या खरेदीसाठी परराज्यातील चोखंदळ ग्राहकांची उपस्थिती या उपक्रमाचे यश आहे.

तालुक्‍यातील अश्वप्रेमी संघटनेच्या कार्याची माहिती सांगून, रणजितसिंह देशमुख यांनी खंडोबाच्या यात्रेमुळे प्रसिध्द असलेल्या या देवस्थानात देवाचे वाहन म्हणून अश्वाला पसंती दिली जाते. 
या प्रदर्शनाची व्याप्ती वाढली आहे. आगामी काळात देशभरात या प्रदर्शनाची महती पोचेल, असा विश्वास व्यक्त केला. आमदार आशुतोष काळे यांनी मनोगत व्यक्त केले. 

६६७ घोडे
या प्रदर्शनात सुमारे 667 अश्व आणले आहेत. प्रशिक्षित अश्वांचे साहसी, थाळा, बुलेट, बाजेवरील नृत्य व इतर कसरती लक्षवेधक ठरत आहेत. दोन लाखांपासून 50 लाखांपर्यंत त्यांची किंमत आहे. नुकरा, मारवाड, राजस्थानी, काठेवाडी या जातीचेही घोडे या प्रदर्शनात आहेत. तालुक्‍यातील अनेक युवक या छंदाकडे शेतीला पूरक जोडधंदा म्हणून बघतात.

कुत्र्यांचेही प्रदर्शन

या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच गाय, बैल, शेळी, कुत्रा, कोंबडी, राजहंस पक्षी, कबुतर, डांगी बैल, खिल्लार व गीर गाय आदी पशुपक्ष्यांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.