इथे पहा ः पावसाने  बाजरी, मका भुईसपाट 

सदाशिव पुकळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

झरे, ःआटपाडी तालुक्‍यातील विभुतवाडी, गुळेवाडी परिसरातील शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामध्ये खरीपातील मका, बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले. दोन्हीही पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

झरे, ःसांगली, आटपाडी तालुक्‍यातील विभुतवाडी, गुळेवाडी परिसरातील शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामध्ये खरीपातील मका, बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले. दोन्हीही पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

आटपाडी हा तालुका हा दुष्काळ तालुका आहे. या तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने मागील पंधरा ते वीस वर्षांमध्ये पूर्ण क्षमतेने खरिपाचा पेरा झाला नव्हता. मात्र यंदा पाऊस बऱ्यापैकी पडल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त खरीपाच्या पेरण्या केल्या आहेत. 

खरीपाच्या पेरण्या झाल्यापासून कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडत होता. मात्र शुक्रवारी सायंकाळी आटपाडी तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस तालुक्‍यात विभुतवाडी, गळेवाडी, झरे परिसरामध्ये झाला.

त्यामुळे येथील ओढे, नाले, तुडुंब भरून वाहू लागले आहेत. यापावसाने अनेक शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली. परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेकऱ्यांचे पंचनामे करून त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

संपादन ः अमोल गुरव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See here: Rain-fed millet, maize flattened