पहा नवी शक्कल ः दुधाच्या  किटलीतून चक्क दारू विक्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

आटपाडी ः  कोरोणाची साथ आणि संचारबंदी असतानाही दारू विक्रेते मात्र विविध शक्कल लढवून दारूची विक्री करीत आहे. खरसुंडी येथे असाच एकजण दुधाच्या किटली मध्ये दारूच्या बाटल्या घेऊन जाताना युवकांच्या सतर्कतेमुळे पकडला. 

आटपाडी  (सांगली) ः   कोरोणाची साथ आणि संचारबंदी असतानाही दारू विक्रेते मात्र विविध शक्कल लढवून दारूची विक्री करीत आहे. खरसुंडी येथे असाच एकजण दुधाच्या किटली मध्ये दारूच्या बाटल्या घेऊन जाताना युवकांच्या सतर्कतेमुळे पकडला. 

यामध्ये पोलिसांनी अकरा दारूच्या बाटल्या मोटर सायकलसह दारू घेऊन जाणार याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संचार बंदीमुळे दारूबंदी केली आहेंपण पण दारू विक्री ते आणि पिणारे विविध शक्कल लढवून आपली तलप भागवत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरसुंडी ग्रामपंचायत व पोलीस मित्र यांच्या साह्याने खरसुंडीकडे येणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. 

तेथे पोलीस मित्रांचा अहोरात्र पहारा सुरू आहे. काल सायंकाळी झरे रोडवर नाकाबंदी सुरू असताना एक संशयित दुधाच्या किटली घेऊन चिंचाळेकडे जात असताना युवकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ खरसुंडी दूरक्षेत्राकडे कार्यरत असलेल्या पोलिसांशी संपर्क करून सदर इसमास ताब्यात घेतले. त्याची दुधाची किटली उघडली असता त्यामध्ये देशी दारू च्या अकरा बाटल्या आढळून आल्या.

या प्रकारामुळे सारेच आवाक झाले. पोलिसांनी 3800 रुपयेची दारू आणि आणि पन्नास हजार रुपयाची मोटरसायकलय ताब्यात घेतली. याप्रकरणी विठ्ठल बाळु तुपे रा.खरसुंडी यास ताब्यात घेतले तसेच सदरचा माल पुरवणारा विक्रम गायकवाड रा. चिंचाळे यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान युवकांची सतर्कता व पोलिसांची नाकेबंदी यामुळे खरसुंडीत अवैध धंदेवाल्यांची धाबे दणाणले आहे या कारवाईत खरसुंडी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय परशकर,पोलीस कर्मचारी श्री. वगैरे ,सचिन लोंढे व पोलीस मित्रांनी सहभाग घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See New Shape: Sales of Alcohol from Milk Kettle