पहा वाचनवेड्या ग्रुपवर  तब्बल 200 पुस्तकांचा मेळा 

download.jpg
download.jpg
Updated on

तासगाव (सांगली) : सद्या सर्वजण लॉकडाऊन आहेत, या मोकळ्य वेळेचे करायचे काय? हा सर्वांना प्रश्न पडला आहे. या काळात हातात असलेल्या मोबाईलचा सदुपयोग अनेकजन वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. अशाच एका "वाचनवेड्यां"चा ग्रुपवर 200 पेक्षा जास्त मराठी इंग्रजी हिंदी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. विशेष म्हणजे 900 जण या आगळ्या डिजिटल ग्रंथालयाचा लाभ घेत आहेत. 

होय ! याला डिजिटल ग्रंथालायच म्हणावे लागेल इतकी पुस्तके, संदर्भ ग्रंथ ,"कोरोना स्टे ऍट होम रीड बुक" या ग्रुपवर वाचकांनी वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. हा ग्रुप सुरू केला सांगलीच्या राजकुमार राठोड यांनी मराठी साहित्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर, म. ज्योतीबा फुले, म. गांधी अण्णाभाऊ साठे, पु ल देशपांडे, व पु काळे यांच्या पासून ते डॉ. धर्मानंद कोसंबी, शंकर पाटील, शिवाजी सावंत, यांची ग्रंथसंपदा या ग्रुपवर उपलब्ध आहे. एक ना अनेक नामवंत लेखकांची पुस्तके संदर्भ ग्रंथ,इंग्रजी मधील विविध लेखकांची पुस्तके, विज्ञान या विषयाला वाहिलेली शास्त्रज्ञ लेखकाची पुस्तके अशी अक्षरशः वाचकाना वाचनाची मेजवानी या कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे मिळत आहे. 

मिशन कोरोना रीड बुक्‍स या एका वाचनवेड्या ग्रुपची संख्या वाढल्याने आता त्याचे चार ग्रुप झाले आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये 250 सदस्य संक्‍या गृहीत धरल्यास 1000 वाचक सद्या या अफलातून संकल्पनेतुन एकत्र येऊन वाचनाचा आनंद घेत आहेत.

महाराष्ट्रातील बहुतांशी सर्व जिल्ह्यातील वाचकांचा यात समावेश तर आहेच पण अमेरिका, यु. के. , युगांडा, सेशेल्स येथील वाचकही या ग्रुपवर सक्रिय वाचक आहेत. एखादे कोणते पुस्तक आहे का अशी विचारणा झाल्यावर अवघ्या काही तासात एखादा वाचक ते पुस्तक उपलब्ध करून ग्रुपवर टाकतो ही हा ग्रुपची खासियत बनली आहे. लॉक डाऊन च्या काळात विरंगुळा म्हणून डिजिटल माध्यमाचा अतिशय चांगला उपक्रम या शिवाय अन्य नसावा हे नक्की ! 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक घरात बांधून रहावेत म्हणून सुरू केलेला हा ग्रुप आहे. विरंगुळ्या बरोबर मानसिक स्वास्थ्य मिळावे या निखळ हेतूने सुरू केलेल्या या उपक्रमातून एका आवडीचे अनेक लोक एकत्र आले हे ही तितकेच महत्वाचे आहे. 

राजकुमार राठोड 
ग्रुप अडमीन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com