पहा कसा असेल "कोरोना इफेक्‍ट'

पहा कसा असेल "कोरोना इफेक्‍ट'
Updated on

सातारा सातारा सातारा 

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्याला मिळणाऱ्या निधीत कपात केल्यानंतर शासनाने निधी खर्चावरही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील केवळ 50 कोटींची अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकणार आहे. या वर्षी मंजुरी दिलेल्या सुमारे 400 कोटींच्या कामांना ब्रेक लागला आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर 23 मार्चपासून लॉकडाउन जाहीर झाला आहे. येत्या 17 मेपर्यंत हा लॉकडाउन कायम राहणार आहे; पण या लॉकडाउनचा राज्य सरकारच्या तिजोरीला फटका बसला आहे. कर स्वरूपात मिळणारा महसूल बंद झाल्याने तिजोरीवरील खर्चाचा बोजा वाढू लागला आहे. 

कोरोनावरील उपाय योजनांवरच सर्वाधिक भर दिला जाणार असल्याने शासनाने इतर विकासकामांच्या निधीत कपात करत केवळ एकूण नियोजन आराखड्याच्या दहा टक्‍केच निधी उपलब्ध केला. उर्वरित निधी नंतर दिला जाईल, असे सांगितले; पण कोरोना रोखण्यासाठी लागणारी साधनसामग्री आणि आरोग्यविषय उपाययोजनांना मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होणार आहेत. त्यामुळे शासनाने सध्या मंजूर असलेल्या कामांना ब्रेक बसला आहे. 

सध्या केवळ अपूर्ण असलेल्या कामांनाच निधी उपलब्ध होऊन कामे पूर्ण केली जाणार आहेत. सध्या विविध विभागांकडील गेल्या वर्षीची 50 कोटींची कामे अपूर्ण आहेत. त्यामध्ये काही रस्ते, साकव पूल, तलाठी कार्यालये, जनसुविधा (पाच हजारांच्या आतील गावे) व नागरी सुविधा अंतर्गत (पाच हजारांवरील गावे) गावांतील अंतर्गत कामे यांचा समावेश आहे.

या वर्षी मंजुरी दिलेल्या विविध विभागांकडील चारशे कोटींच्या कामांना ब्रेक लागला आहे. यातील काही महत्त्वाची कामे सुरू करायची असतील, तर त्यासाठी जिल्हाधिकारी व पालकमंत्री एकत्रिपणे निर्णय घेऊ शकणार आहेत. त्यासाठी कामांचा प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Political News
Sangli Municipal Corporation Recruitment
Krishna River Crocodile Sighting
Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced
Marathi News Esakal
www.esakal.com