
प्रभाग समिती तीनच्या हद्दीतील पाच बेवारस वाहने अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे जप्त करण्यात आली. महापालिका आरोग्य विभागानेही या कारवाईमध्ये सहभाग नोंदवला.
कुपवाड : प्रभाग समिती तीनच्या हद्दीतील पाच बेवारस वाहने अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे जप्त करण्यात आली. महापालिका आरोग्य विभागानेही या कारवाईमध्ये सहभाग नोंदवला. अतिक्रमण निर्मूलन पथक आणि आरोग्य विभाग कुपवाड यांच्या संयुक्त कारवाईमध्ये वर्षानुवर्षे रस्त्याकडेला अडथळा बनून उभ्या असणाऱ्या पाच वाहनांना जप्त करण्यात आले.
प्रभाग एक वसंत कॉलनी एम एच 01 व्ही 1123 चारचाकी वाहन,प्रभाग आठ अष्टविनायकनगर दहाव्या गल्लीतील तीन चाकी रिक्षा वाहन एम.एच 10 ए 1289,राजबाग विद्यानगर चारचाकी वाहन एम.एच 12 सी.ए 6025, प्रभाग क्रमांक नऊ माळी वस्तीतील चारचाकी वाहन एम.एच 9 ए.बी 334, संजयनगर बसस्थानकामागील खुल्या जागेत बंद असणारी विनानंबर रिक्षा अश्या ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनांचा तपशील आहे.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने आरोग्य विभागासह कारवाई केल्याची माहिती सहा.आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली. अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख दिलीप घोरपडे, आरोग्य निरीक्षक अनिल पाटील,सिद्धांत ठोकळे,अतुल आठवले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
सर्व्हेला सुरवात
कुपवाड परिसरातील चारही प्रभागमध्ये बेवारस वाहनांच्या सर्व्हेला सुरवात झाल्याची माहिती सहा.आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली. गायकवाड म्हणाले, अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांच्या सर्वेचे आदेश स्वच्छता निरीक्षकांना दिले आहेत. येत्या चार दिवसात आणखी कारवाई केली जाईल.
संपादन : प्रफुल्ल सुतार