खेळायला गेल्यास पोलिस शाळेत ठेवतील... 

 "Self-discipline" of those who came from the city; children also locked in the house
"Self-discipline" of those who came from the city; children also locked in the house
Updated on

इटकरे  (जि. सांगली) : पुणे-मुंबईसह अन्य भागातील रेड आणि कंटेन्मेंट झोनमधून गावाकडे परतणाऱ्या अनेकांनी तिथे पाळलेली स्वयंशिस्त गावात देखील अंगिकारली आहे. मोठ्यांसह लहानांनी देखील आवडीचे खेळ टाळून पोलिसांच्या भीतीने घरात कोंडून घेतले आहे. बाहेर पडलो तर पोलिस घेऊन जातील किंवा शाळेत रहावे लागेल अशी मनाची समजूत ती घालतात. कडक नियमांसह हे सर्वजण वापरत असलेली आचार संहिता संबंधीत सर्वांनी पाळली तरच कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश येणार आहे. 

पुणे-मुंबईसह अन्य भागात अडकलेल्या नोकरदार, विद्यार्थी व अन्य नागरिकांना शासनाने गावाकडे जाण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी घरगुती किंवा संस्थात्मक विलगीकरणासारखे काही नियम बंधनकारक केले आहेत. शहरात रेड आणि कंटेन्मेंट झोन मधून गावात आलेल्या अनेकांनी मात्र आदर्श नियमावली स्वतः अंगीकारली आहे. 

गावात आल्यानंतर स्वतःहून प्रशासनाला माहिती देणे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार तपासणी करुन घेणे, तपासणीनंतर लक्षणानुसार घरात किंवा संस्थेत विलगीकरण कक्षात राहणे यासाठी ते स्वतःहून पुढे येत आहेत. 

होम क्वारंटाईनमध्ये असलेल्यांनी तर जास्तच दक्षता घेतलेली दिसत आहे. घराच्या एका खोलीत ते राहतात. त्या खोलीबाहेर क्वारंटाईनचा फलक लावणे, जेवण किंवा गरजेच्या इतर काही वस्तू हव्या असल्यास त्या घेऊन येणाऱ्याने जमिनीवर ठेवायच्या आणि नंतर आपण उचलायच्या, वेळच्या वेळी तपासणी करुन घ्यायची. एकाच घरात रहात असले तरी काही काम लागल्यास या खोलीतून दुसऱ्या खोलीत संवादासाठी मोबाईलचा वापर, सातत्याने सॅनिटायझरचा वापर असे काही नियम ते पाळतात.

त्यांच्याशिवाय मुलांनीही स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. गावाकडची मुले घराबाहेर खेळताना दिसली की या मुलांनाही खेळायला जाण्याची इच्छा होते; मात्र बाहेर पडलो तर पोलिस घेऊन जातील किंवा शाळेत रहावे लागेल अशी मनाची समजूत घालतात. दुसरीकडे काही शहरीबाबू गावात चोरुन प्रवेश करतात, कुणालाच माहिती न देता वावरतात. त्यांचा वावर त्यांच्या कुटुंबियांसह संपुर्ण गावाला धोक्‍यात आण ूशकतो. शहरातून गावात येणाऱ्या सर्वांनीच आदर्श आचारसंहिता पाळली तरच कोरोनाचा प्रसार रोखणे शक्‍य होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com