दहावीचे विद्यार्थी, पालकहाे तुमच्यासाठी...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 December 2019

दहावी परीक्षेला तीनच महिने राहिले असल्याने अभ्यास कसा करावा, परीक्षेचे ओझे न बाळगता परीक्षेला कसे सामोरे जावे, यांविषयी मार्गदर्शनपर चर्चासत्राचे रविवारी (ता. 15) आयाेजन करण्यात आले आहे. 

सातारा : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच परीक्षा पद्धतीमध्येही आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. या बदलांना सामोरे जाताना अभ्यासाचे नियोजन कसे करावे, परीक्षेचे नेमके स्वरूप यांविषयी विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन हवे असते. याच उद्देशाने "सकाळ विद्या' व "क्रिएटिव्ह ऍकॅडमी' च्या वतीने साताऱ्यात रविवारी (ता.15) चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
 
शालेय अभ्यासक्रमात प्रश्‍नपत्रिका व विषयांनुरूप झालेले बदल समजून घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी हे चर्चासत्र महत्त्वाचे ठरणार आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रश्‍नपत्रिकांचे स्वरूप कसे असणार आहे, त्या अनुषंगाने अभ्यासाचे व वेळेचे नियोजन कसे असावे. परीक्षेला तीनच महिने राहिले असल्याने अभ्यास कसा करावा, परीक्षेचे ओझे न बाळगता परीक्षेला कसे सामोरे जावे, यांविषयी पुण्यातील नामांकित वक्‍ते प्रा. एन. ए. शेख मार्गदर्शन करतील.

""सातवी-आठवीच्या विद्यार्थी व पालकांनी शिक्षणाचे बदलते स्वरूप म्हणजेच "न्यू एज्युकेशन प्लॅन 2020' विषयी जाणून घेण्यासाठी आर्वजून उपस्थित राहावे.'' दहावीनंतर मेडिकल व इंजिनिअरिंग व्यतिरिक्त उपलब्ध असणारे करिअरचे पर्याय, विद्यार्थ्यांचा कल पाहून योग्य पर्यायांची निवड कशी करावी. दहावीनंतर होणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिक्षण संस्था व त्यांची तयारी कशी करावी, यांविषयी सखोल मार्गदर्शन या चर्चासत्रातून मिळेल. 

कधी : रविवार (ता. 15) 
कोठे : यशवंतराव चव्हाण सभागृह, सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक मुख्य कार्यालय, जिल्हा परिषद ऑफिससमोर, सदरबझार, सातारा 
केव्हा : सकाळी 10.30 वा. 
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः 9922913345


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seminar on Sunday In Satara To Guide SSC Students And Their Parents