
टेंभुर्णी : पत्ता विचारण्याच्या बहाणा करून एका ज्येष्ठ महिलेला कार मध्ये बसवून नेऊन डोळ्यात चटणी टाकून जबरदस्तीने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, बोरमाळ, कानातील वेल, फुले,जुबे,बुगडी असा सुमारे साडे तोळे सोन्याचे सुमारे एक लाख 57 हजार रूपये किंमतीचे दागिने,रोख पन्नास हजार व एक मोबाईल असा सुमारे दोन लाख नऊ हजार रूपये किंमतीचा ऐवज कारमधील एक पुरूष व एका महिलेने लुटून नेला. ही घटना गुरूवारी दुपारी बारा ते दिड वाजण्याच्या दरम्यान टेंभुर्णीतील सोलापूर- पुणे बायपास महामार्गानजिक घडली.