
टेंभुर्णी : पत्ता विचारण्याच्या बहाणा करून एका ज्येष्ठ महिलेला कारमध्ये बसवून घेऊन जाऊन डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या एक पुरूष व एक महिला अशा दोघांना आरोपींना टेंभुर्णी पोलीसांनी जेरबंद केले असून हे आरोपी दैनंदिन खर्चासाठी जबरी चोरीचे गुन्हे करीत होते. त्यांच्याकडून टेंभुर्णीसह पंढरपूर (ग्रामीण) मधील दोन व माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चोऱ्या उघड करण्यात पोलीसांना यश आले आहे. या आरोपींकडून 60.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 11 हजार रूपये रोख व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण 7 लाख 23 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.