खाजगी लक्झरी पलटी होऊन भीषण अपघात, तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

barshi.jpg
barshi.jpg

बार्शी  : मुखेड हुन मुंबईकडे निघालेल्या खाजगी लक्झरी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तीन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर बसमधील बावीस तेवीस प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वांगरवादी (ता.बार्शी) घडली. 

मुखेड(जि. नांदेड) येथून (एम.एच. ०४ जी.पी. ५१५१) ही खाजगी लक्झरी बस मुंबईकडे निघाली होती. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बसने बार्शी क्रॉस करून कुर्डुवाडी मार्गे मुंबईकडे जात होती. सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बस वांगरवाडी शिवार आल्या नंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. रात्रीच्या प्रवास सर्व प्रवाशी झोपलेले असताना वेगात असलेली बस अचानक पलटी झाल्याने प्रवाश्यांनी सावध होण्याआधीच अनेकजण बसच्या खाली अडकले. घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतकार्य सुरू केले.

रात्रीच्या वेळी मदतीसाठी मनुष्यबळ कमी असल्याने पलटी झालेली बस खालील अडकलेले प्रवाशी काढण्यासाठी पोलिसांना जेसीपी मशीन बोलवावी लागली. बस पन्नास फूट पर्यंत घसरत जाऊन त्याच्या खाली सापडून आर्वी मोहन देवकते (रा.विंदगी खुर्द ता.अहमदपुर जि लातुर), फैज इस्माईल पठाण वय तिन वर्ष (रा.दामुननगर आदिवली मुंबई), धनश्री ज्ञानेश्वर मुकनर वय 12 वर्ष रा.हिप्परगा(शहा) ता.कंदार जि.नांदेड या तिघींचा अंत झाला. तर रत्नमाला ज्ञानेश्वर मुकनर या महिलेचा हात कट झाला आहे. 

तसेच रामदास करण सुरनर, सावित्री रामदास सुरनर (सुनेगाव, ता.अहमदपूर), रेणुका बालाजी एलकुरवाड (वंजारवाडा, ता.जळकोट), आस्था सुनील मोहाले, सुवर्णा सुनील मोहाले (बोडके, ता.अहमदपूर), हरिओम ज्ञानेश्वर मुकतर, रत्नमाला ज्ञानेश्वर मुकतर, ज्ञानेश्वर नामदेव मुकनर (शहादिप्पारगाव, ता.कंदर), बाबू शाहीन शहा, सहीबा युसूफ शेख (साकीनाक, मुंबई), चंद्रपाल उल्लप्पा डावले, (रा.उदगीर), बालाजी सुखीनाथ बिचकुंदे (अदनूर, ता.जळकोट), वर्षा सुदर्शन नरवाडे (वायगाव, ता अहमदपूर), राजश्री दत्ता हाके (रामपुरी, ता. गंगाखेड), इस्माईल चंदू पठाण, किरदोस इस्माईल पठाण (आंदोरा, ता. औसा), शुभांगी मोहन देवकते, मोहन देवकते (शिंदगी, ता.अहमदपूर), माया संजय जाधव (वडगाव, ता.उदगीर), महादेव बासू आवटे (खेड, ता.उस्मानाबाद), गहिना शेख (मुंबई), सतीश विश्वनाथ मोरे (सलगर, ता.अहमदपूर), रंजना बालाजी विचकुंद (अतकूर, ता. जळकोट), युसूफ शेख (लातूर) हे जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. 

अपघाता नंतर चालक फरार... 
अपघात झाल्या नंतर मदत मागण्या ऐवजी चालक गाडी तशीच सोडून फरार झाला. चालकाने येडशी येथे धाब्यावर दारू पिली होती असा आरोप प्रवश्यनी केला आहे. या प्रकरणी गाडी चालक शरद शंकर वागदरे याच्या विरोधात बार्शी तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com